Ambabai Mandir: अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहणार, जाणून घ्या कधी आणि का?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Ambabai Mandir: शारदीय नवरात्रौत्सवाला लवकरच प्रारंभ होणार आहे. त्याआधीच कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातून महत्त्वाची बातमी आहे.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाला लवकरच प्रारंभ होत असून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात तयारीला वेग आला आहे. गुरुवारपासून मंदिराच्या स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या आय स्मार्ट फॉसेटिक कंपनीच्या वतीने दरवर्षी ही सेवा मोफत दिली जाते. अत्याधुनिक मशिनरींसह कंपनीचे 25 कर्मचारी पुढील आठ दिवस हे काम करणार आहेत, बुधवारी (दि. 17 रोजी) देवीचा गाभारा स्वच्छ केला जाणार आहे. त्यामुळे यादिवशी श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहील.
गेल्या 20 वर्षांपासून मुंबईतील आय स्मार्ट कंपनीच्या वतीने मंदिराच्या स्वच्छतेची सेवा मोफत दिली जाते. गुरुवारी सकाळी 25 जणांच्या टीमचे कोल्हापुरात आगमन झाले. अंबाबाई मंदिरात सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या उपस्थितीत स्वच्छतेच्या मशिनरींचे पूजन झाले. त्यानंतर मूळ स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ झाला. पुढील 8 दिवसांत संपूर्ण मंदिराची स्वच्छता करण्यात येणार आहे.
advertisement
बुधवारी दर्शन बंद
आय स्मार्ट कंपनीकडून बुधवारी देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार असून या दिवशी एकादशी आहे. याच स्वच्छतेच्या कामामुळे देवाच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
देवीच्या खजिन्यात दीड कोटींची भर
अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांतील रकमेची मोजदाद गेल्या चार दिवसांपासून सुरू होती. ती गुरुवारी पूर्ण झाली. यामध्ये गेल्या दीड महिन्यात देवीच्या खजिन्यात दीड कोटींचे दान वाढली आहे. अंबाबाई मंदिराच्या उत्पन्नात 1 कोटी 56 लाख 84 हजार 533 रुपयांची भर पडली आहे. सर्वाधिक दान हे 2 नंबरच्या पेटीत आले असून यामध्ये 44 लाख 68 हजार रुपये निघाले आहेत.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 12, 2025 9:09 AM IST
मराठी बातम्या/Temples/
Ambabai Mandir: अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहणार, जाणून घ्या कधी आणि का?