Jagdeep Dhankhar : राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच दिसले जगदीप धनगड, प्रकृती कशी?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयदीप धनगड हे सार्वजनिक जीवनापासून अलिप्त राहिल्याने आणि कोणाशीही संपर्कात नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.
नवी दिल्ली: उपराष्ट्रपतीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर जयदीप धनगड हे कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नसल्याचे चर्चांना उधाण आले होते. जगदीप धनखड हे सार्वजनिक जीवनापासून अलिप्त राहिल्याने आणि कोणाशीही संपर्कात नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर जगदीप धनगड यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत चर्चांना पूर्णविराम लावला.
जगदीप धनखड यांनी 21 जुलै 2025 रोजी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर देशातील राजकारण तापले. राजीनाम्यानंतर ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत किंवा त्यांचे कोणतेही वक्तव्य समोर आले नव्हते. जवळपास 50 दिवसांपासून धनगड यांची खबरबात नसल्याने चर्चांना उधाण आले होते. देशाच्या माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा खासदारांना व राजकीय कार्यकर्त्यांना नाही, ही लोकशाहीसाठी गंभीर बाब असल्याचे विरोधकांनी म्हटले होते.
advertisement
अन् धनगड दिसले...
देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्ण यांचा आज शपथविधी दिल्लीत राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि माजी उपराष्ट्रपती देखील उपस्थित होते. हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू या माजी उपराष्ट्रपतींसह जयदीप धनगड हे देखील दिसून आले. यावेळी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्राथमिकरीत्या दिसून आले. मात्र, या कार्यक्रमात धनगड यांनी हजेरी लावल्याने त्यांच्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे.
advertisement
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जयदीप धनगड यांनी सी. पी. राधाकृष्ण यांचे अभिनंदन करणारे ट्वीट केले होते. जवळपास दोन महिन्यानंतरचे त्यांचे हे सार्वजनिक वक्तव्य होते. त्यानंतर आता धनगड आजच्या शासकीय कार्यक्रमात दिसून आले.
धनगड यांच्या शेजारी कोण बसले?
सीपी राधाकृष्णन यांनी देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मोठे नेते उपस्थित होते. यावेळी जगदीप धनखड देखील राष्ट्रपती भवनात उपस्थित होते. उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात धनखड यांची ही पहिली झलक होती. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू त्यांच्या शेजारी बसले होते. नायडू यांच्या शेजारी आणखी एक माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी बसले होते. विशेष म्हणजे, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला देखील जगदीप धनखड बसलेल्या रांगेत बसले होते.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
September 12, 2025 10:31 AM IST