जबरदस्त कॉन्ट्रोव्हर्सी, FIR नंतर परत येतोय The Latent Show! समय रैनाने दिली मोठी हिंट, कधी होणार रिलीज?

Last Updated:
Samay Raina Show : वादग्रस्त विधान आणि इतर असंवेदनशील विनोदांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन समय रैना अखेर त्याच्या लोकप्रिय शोसोबत परतणार आहे.
1/8
मुंबई: काही महिन्यांपूर्वी पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादियाच्या एका वादग्रस्त विधानामुळे आणि इतर असंवेदनशील विनोदांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन समय रैना अखेर त्याच्या लोकप्रिय शोसोबत परतणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या प्रचंड गदारोळामुळे समयने त्याच्या 'इंडियाज गॉट लेटंट' या शोचे सर्व एपिसोड्स यूट्यूबवरून हटवले होते.

advertisement
2/8
मात्र, आता चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. शनिवारी ८ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या 'स्टील अलाईव्ह अँड अनफिल्टर्ड' टूरदरम्यान समय रैनाने या शोच्या दुसऱ्या सिझनबाबत मोठी घोषणा केली.

3/8
डीएनए (DNA) च्या रिपोर्टनुसार, समय रैना मैदानावर प्रेक्षकांशी संवाद साधत असताना म्हणाला, मी शो परत आणणार. हे ऐकून प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्या वाजवून आणि ओरडून आपला उत्साह व्यक्त केला.

4/8
रणवीर अल्लाहबादियाने एका स्पर्धकाला 'पालकांच्या सेक्स'बद्दल अयोग्य प्रश्न विचारल्यानंतर हा शो मोठा वादाचा केंद्र बनला होता. त्यानंतर रणवीर, समय, अपूर्वा मुखर्जी आणि आशिष चंचलानी यांच्यावर अनेक एफआयआर दाखल करण्यात आले होते.

5/8
अनेक वादांमुळे समयला हा शो बंद करावा लागला. त्यानंतर त्याने त्याचा २८ वा वाढदिवस साधत सार्वजनिकरित्या माफी मागितली होती. त्याने अपंगत्व असलेल्या लोकांबद्दल केलेल्या असंवेदनशील विनोदांबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.

6/8
'CURE SMA Foundation of India' ने समय रैना आणि इतर कलाकारांविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर समयसह विपुल गोयल, सोनाली ठक्कर, निशांत तन्वर आणि बलराज घई यांनी संयुक्त निवेदन जारी केले होते.

7/8
निवेदनात लिहिले होते,
निवेदनात लिहिले होते, "आमच्या शोमुळे झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. यापुढे आम्ही अधिक जागरूक राहू आणि समाजातील आव्हानांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू."
advertisement
8/8
या प्रकरणावरून विनोदाच्या मर्यादा आणि ऑनलाइन आशयाचे नियमन यावर मोठी चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता सर्व वाद मागे टाकून समय रैना दुसऱ्या सिझनसह परतण्यासाठी सज्ज झाला आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement