Bike Rules : टोलनाक्यावर बाईक्सना Toll का द्यावा लागत नाही? ही फक्त एक सुट नाही तर यामागे आहे कायदा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Toll Tax on Two Wheelers : काहींना वाटतं, ही फक्त सोयीसाठी दिलेली सवलत आहे. पण खरं म्हणजे यामागे कायदा आहे आणि तो स्पष्ट सांगतो की दोनचाकी वाहनांना टोलपासून पूर्ण सूट दिलेली आहे.
हायवेवर पाहिलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची वाहानं दिसतील. ज्यामध्ये बाईक, कार, टेम्पो, रिक्षा, ट्रक, लॉरी सारखे वेगवेगळी वाहानं दिसतील. शहरात किंवा गावात तर ते सहज फिरतात पण, मोठ्या रस्त्यांवरुन जाताना या वाहानांना टोल लागतो. प्रत्येक वाहानासाठी त्याच्या आकारा आणि प्रकारानुसार वेगवेगळा टोल आकारला जातो. पण तुम्ही या टोलवर एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल की इथे फक्त बाईक आणि रिक्षाला टोल भरावा लागत नाही. पण असं का? असा कधी प्रश्न पडला आहे?
advertisement
advertisement
advertisement
पण असं का? तर आपण आधी हे टोल का घेतला जातो? हे समजून घेऊटोल म्हणजे रस्त्यांच्या बांधकाम, दुरुस्ती आणि देखभालीसाठी सरकारकडून घेतला जाणारा शुल्क. पण दोनचाकी वाहनं वजनाने हलकी आणि आकाराने लहान असल्यामुळे ती रस्त्यावर फारसा दबाव टाकत नाहीत. उलट ट्रक, बस यांसारखी जड वाहनं रस्त्याचं जास्त नुकसान करतात. त्यामुळे बाईकसारख्या हलक्या वाहनांवर टोल आकारणं व्यावहारिकदृष्ट्या आवश्यक नसतं.
advertisement
सर्वसामान्यांसाठी दिलेली सवलतभारतामध्ये बाईक आणि स्कूटर हे मध्यम आणि निम्न उत्पन्न गटातील लोकांसाठी सर्वात स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाचं साधन आहे. जर या वाहनांवर टोल लावला गेला असता, तर लाखो दैनंदिन प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक ओझं पडलं असतं. त्यामुळे सरकारने सामाजिक दृष्टिकोनातूनही या वाहनांना सूट दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement


