पुणे आता पहिल्यासारखं राहिलं नाही! ‘या’ भागात धोका वाढला, आकडेवारीनं वाढवलं टेन्शन!

Last Updated:
Pune News: पुणेकरांना घराबाहेर पडताना जरा विचार करूनच बाहेर पडावं लागणार आहे. शहरात धोका वाढला असून हवा अतिखराब पातळीवर गेलीये.
1/7
गेल्या काही महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हवामानात प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील हवेची गुणवत्ता अनेक ठिकाणी अतिखराब पातळीवर नोंदवली जात आहे. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाकड आणि हिंजवडी परिसरातील हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांत गंभीर स्तरावर पोहोचली आहे. या भागात कार्यरत असलेल्या आरएमसी प्रकल्पांमुळे हवेत धुळीचे प्रमाण वाढत असून प्रदूषणात भर पडत आहे.

advertisement
2/7
याशिवाय सलग सुट्टीमुळे बाहेर पडलेल्या प्रवाशांच्या वाहनांची संख्या वाढल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. परिणामी, या परिसरातील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) धोकादायक 300 च्या पुढे गेला आहे. डिसेंबरच्या पहिल्याच पंधरवड्यात शहराच्या एक्यूआयने 14 दिवसांपैकी सात दिवस 200 अंकांची मर्यादा ओलांडली होती. यामुळे डिसेंबर महिना सुरू झाल्यापासूनच हवेची पातळी खालावत आहे.

3/7
हवेची गुणवत्ता अतिखराब स्तरावर पोहोचल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दीर्घकाळ अशा प्रदूषित वातावरणात राहिल्यास सामान्य नागरिकांनाही श्वसनास अडथळे येऊ शकतात. दमा, श्वसनविकार किंवा ॲलर्जी असलेल्या रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक ठरत आहे.

4/7
आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, वाढलेल्या प्रदूषणामुळे फुफ्फुसांवर ताण येणे, घसा कोरडा पडणे, सतत खोकला तसेच डोळ्यांत जळजळ होण्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.

5/7
वाकड येथील भूमकरनगर भागात शहरातील सर्वाधिक प्रदूषणाची नोंद झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 242 ते 287 दरम्यान होता. मात्र, शुक्रवारपासून प्रदूषणात लक्षणीय वाढ दिसून आली. शुक्रवारी एक्यूआय 324, शनिवारी 300 तर रविवारी 314 इतका नोंदवण्यात आला.

6/7
एका महिन्यात पाच वेळा या परिसरातील हवा अतिखराब श्रेणीत गेली असून, त्यापैकी तीन दिवस याच आठवड्यात होते. भूमकरनगर परिसरातील हवेत पीएम 2.5 सूक्ष्म कणांचे सरासरी प्रमाण 307 तर पीएम 10 चे प्रमाण 251 इतके आढळून आले आहे. सध्याची हवेची पातळी श्वसनासाठी अत्यंत अपायकारक मानली जात आहे.

7/7
वाकड आणि हिंजवडी भागात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील बांधकाम कामांमुळे हवेत धुळीचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाय पुरेशा प्रमाणात राबवले जात नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय परिसरात कार्यरत असलेल्या अनेक आरएमसी प्रकल्पांमधून उडणारी सिमेंटची धूळ आणि या प्रकल्पांशी संबंधित जड वाहनांची वर्दळ यामुळेही हवेची गुणवत्ता घसरत आहे. परिणामी, या भागातील प्रदूषणाची समस्या अधिक तीव्र होत चालली आहे.

BMC Election: कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आजपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे.

  • मेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच राजकीय हालचालींना वेग आला

  • काही महापालिकांमध्ये जुनी राजकीय समीकरणं विस्कटताना दिसत आहेत

View All
advertisement