आजचं हवामान: वारं फिरलं, पितृपक्षात मुसळधार पावसाचं संकट, 4 जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पश्चिम बंगालच्या खाडीतील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात मुसळधार पावसाचं सावट आणतोय. रायगड, घाटमाथा, सांगलीला रेड अलर्ट तर अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा.
पश्चिम बंगालच्या खाडीतून महाराष्ट्राच्या दिशेनं वारं पुढे सरकत आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस राहणार आहे. पावसाने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात विश्रांती घेतली होती. तर सोलापूरमध्ये रातोरात ढगफुटीसदृश्यं पाऊस झाल्यानं तिथे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. नदी ओढ्यांना पूर आल्याने रस्ते जलमय झाले आणि लोकांच्या घरातही गुडघाभर पाणी शिरलं. सोलापूरमध्ये मागच्या 48 तासात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
हवामान विभागाचे तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तिथून वारं महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे सरकत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रावर पावसाचं सावट आहे. यंदा नवरात्र आणि दिवाळीतही पाऊस राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यातही महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम राहणार आहे.
दुसरीकडे पावसाचा जोर आज कोकण, पश्चिम महाराष्ट्रात कमी असला तरी 13 सप्टेंबरपासून पुन्हा वाढणार आहे. रायगड, रत्निगिरी, जळगाव, नाशिक, घाटमाथा, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, घाटमाथ्यावर, सोलापूर, चंद्रपूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढचे 48 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
रायगड, घाटमाथा, सांगलीमध्ये ऑरेंज ते रेड अलर्ट देण्यात आला आहे. 40-50 किमी वेगाने वारे वाहतील आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल.त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, घराबाहेर कामाशिवाय पडू नये असा इशारा हवामान विभागाने केला आहे. अति मुसळधार पावसानं पिकांचं नुकसान होण्याचा धोका देखील आहे.
दुसरीकडे मुंबईसह उपनगर, ठाणे या भागांमध्ये पाऊस अचानक गेल्यामुळे उष्णता वाढली आहे. पावसाने दोन तीन दिवस विश्रांती घेतल्यामुळे उकाडा वाढला आहे. आता पुन्हा एकदा मुंबई, उपनगर आणि ठाण्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर सोलापूरमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 7:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: वारं फिरलं, पितृपक्षात मुसळधार पावसाचं संकट, 4 जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा