आज संकष्टी चतुर्थी! 5 राशींचे नशीब बदलणार,संकटे दूर होणार, श्रीमंती येणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Sankashti Chaturthi 2025 : गणेशोत्सवाचा उत्साह ओसरल्यानंतर आता भाद्रपद महिन्यातील एक विशेष पर्व समोर आले आहे. आज (10 सप्टेंबर) रोजी ‘विघ्नराज संकष्टी चतुर्थी’ साजरी होणार आहे.
मुंबई : गणेशोत्सवाचा उत्साह ओसरल्यानंतर आता भाद्रपद महिन्यातील एक विशेष पर्व समोर आले आहे. आज (10 सप्टेंबर) रोजी ‘विघ्नराज संकष्टी चतुर्थी’ साजरी होणार आहे. अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर येणारी ही पहिलीच संकष्टी असल्याने तिला विशेष धार्मिक महत्त्व आहे. गणेश भक्तांसाठी हा दिवस संकटांचा नाश करणारा आणि सुख-समृद्धी वाढविणारा मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाची विघ्नराज संकष्टी पितृपक्षात आल्याने ती अधिक फलदायी ठरणार आहे. या दिवशी काही ग्रहांचे विशेष संक्रमण होणार असून त्यातून शुभ योग निर्माण होतील. त्यामुळे काही राशींवर गणेशजींचे आशीर्वाद विशेष स्वरूपात राहतील, ज्याचा लाभ नोकरी, व्यवसाय, वैवाहिक जीवन आणि आरोग्य अशा सर्व क्षेत्रांत मिळेल.
विघ्नराज संकष्टीचे महत्त्व
गणपती विसर्जनानंतरचे हे पहिले व्रत असल्यामुळे याला विशेष मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत संतती प्राप्ती, आरोग्य सुधारणा, आर्थिक अडचणींपासून मुक्तता आणि कुटुंबातील आनंदासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. ‘संकष्टी’ म्हणजे संकटांवर विजय मिळविणारी चतुर्थी. त्यामुळे भक्तीभावाने हे व्रत केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात. भक्त या दिवशी उपवास करतात, चंद्रदर्शन करून गणेशाची पूजा करतात आणि मोदक, दुर्वा अर्पण करतात.
advertisement
या राशींवर गणेशकृपा
मेष : मेष राशीच्या लोकांचे अडकलेले कामे पूर्ण होतील. नोकरी व व्यवसायात यश मिळेल. कुटुंबाकडून आधार मिळेल आणि देवदर्शनाची संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
मकर : मकर राशीच्या व्यक्तींवर गणेशाचा विशेष आशीर्वाद राहील. धनलाभ होईल, कुटुंबात सौहार्द वाढेल. मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. गुंतवणुकीसाठी शुभ काळ आहे.
advertisement
मिथुन : नोकरी व व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक नुकसान झालेल्या लोकांना थकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन प्रकल्पांना यश मिळण्याची शक्यता आहे.
कन्या : कन्या राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळेल. घर खरेदीसाठी उत्तम संधी निर्माण होईल. शासकीय स्तरावरील अडथळे दूर होतील. नोकरीत चांगली छाप पाडता येईल.
तूळ : तूळ राशीसाठी दिवस अतिशय भाग्यवान आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील. पती-पत्नी मिळून नवीन मालमत्ता घेऊ शकतात. व्यवसायातील तोटा कमी होईल.
advertisement
धनु : धनु राशीच्या व्यक्तींना आर्थिक संधी वाढतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता मिळेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यशाची शक्यता आहे. विवाहयोग निर्माण होऊ शकतो.
मीन : मीन राशीच्या लोकांना नोकरीच्या उत्तम ऑफर्स मिळतील. पगारवाढीची शक्यता आहे. बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल. कुटुंबातील आरोग्य समस्या दूर होतील.
संकष्टीचे फायदे
संकष्टी व्रताने सुख-समृद्धी वाढते, कुटुंबात शांती आणि आनंद राहतो. भक्तीभावाने केलेल्या पूजेमुळे जीवनात सकारात्मकता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्यामुळे विघ्नराज संकष्टी चतुर्थी ही केवळ धार्मिक विधी नसून जीवनात आशा, विश्वास आणि प्रगतीचा संदेश देणारी आहे.
advertisement
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 6:31 AM IST