Navi Mumbai News : कामावरून घरी परतताना घात झाला, वाशी स्टेशनवर जीव गेला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबई लोकलमधून दररोज हजारो लाखो प्रवासी प्रवास करत असतात.या प्रवासा दरम्यान अपघात होऊन त्यांचा मृ्त्यू झाल्याच्या घटना घडत असतात.
Navi Mumbai News : विश्वनाथ सावंत,प्रतिनिधी,नवी मुंबई : मुंबई लोकलमधून दररोज हजारो लाखो प्रवासी प्रवास करत असतात.या प्रवासा दरम्यान अपघात होऊन त्यांचा मृ्त्यू झाल्याच्या घटना घडत असतात.अशीच एक घटना आज वाशी रेल्वे स्थानकात घडली आहे. या घटनेत धावती लोकल पकडताना एका तरूणाचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. जयेश मळेकर असे या 41 वर्षीय तरूणाचे नाव आहे. या तरूणाच्या मृत्यूने मळेकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, जयेश मळेकर हा तरूण पनवेल ते सीएसएमटी मार्गावरील लोकलमधून वाशी रेल्वे स्थानकात धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात खाली पडून गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
मृताचे नाव जयेश मळेकर असून तो मुंबई सेंट्रल चा रहिवासी आहे . जयेश कामानिमित्त नवी मुंबईत आला होता. घरी परतताना वाशी रेल्वे स्थानक क्रमांक ४ वर मुंबईच्या दिशेने येणारी लोकल पकडण्याचा प्रयत्न करताना तो घसरून खाली पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती.यानंतर त्याला तातडीने वाशीतील मनपा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने मळेकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
November 07, 2025 11:53 PM IST


