Guess Who : 2 वर्षांपासून रिलीज झाली नाही फिल्म, टॉप 10 मधून झाली बाहेर, तरीही अभिनेत्रीचा क्रेझ काही केल्या संपेना
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री गेल्या काही काळापासून एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. पण, ती यातून बाहेर पडत असून तिच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला आहे.
advertisement
advertisement
समंथा म्हणाली की, ती आता सिनेमाच्या शर्यतीत नाही. तिने म्हटलं की, “आधीची समंथा असती, तर तिला एका वर्षात पाच चित्रपट रिलीज व्हावे असं वाटलं असतं, कारण एका यशस्वी अभिनेत्याचं तेच काम असतं. वर्षाला एक तरी ब्लॉकबस्टर चित्रपट द्यावा लागतो, तेव्हाच तुम्ही टॉप १० अभिनेत्यांच्या यादीत येऊ शकता.” पण आता तिला या गोष्टींनी काहीच फरक पडत नाही, असं तिने स्पष्ट केलं आहे.
advertisement
advertisement
समंथाने तिच्या आयुष्यातील एका वाईट टप्प्याबद्दलही सांगितलं. ती म्हणाली की, जेव्हा ती जुनी समंथा होती, तेव्हा ती खूप नाजूक होती. तिला प्रत्येक शुक्रवारी चित्रपट रिलीज झाल्यावर काळजी वाटायची. तिला असं वाटायचं की, ‘माझी जागा कोणीतरी दुसरा घेईल, मी रिप्लेस होईन.’ तिचं आत्म-सन्मान तिच्या चित्रपटांच्या यशावर अवलंबून होतं.
advertisement