Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मंडाळे ते चेंबूर मेट्रोबाबत महत्त्वाचं अपडेट, कधी सुरू होणार?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Metro: मुंबईतील बहुप्रतिक्षित मंडाळे ते चेंबूर मेट्रो लवकरच प्रवाशांचा सेवेत दाखल होणार आहे. याबाबत महत्त्वाचं अपडेट आलं आहे.
मुंबई : बहुप्रतिक्षित डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो 2 बी मार्गिकेबाबत महत्त्वाचं अपडेट आहे. मुंबईकरांच्या सेवेत महिना अखेरीस पहिला टप्प्यातील मेट्रो दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज, 10 सप्टेंबरपासून मंडाळे ते चेंबूर (डायमंड गार्डन) या पहिल्या टप्प्यातील मार्गावर कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (CMRS) पथकाकडून तपासणी सुरु केली जाणार आहे. सुरक्षा प्रमाणपत्र देताच या मेट्रोचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
बहुप्रतिक्षित डी. एन. नगर ते मंडाळे 'मेट्रो 2 बी' मार्गिका 23.6 किलोमीटर लांबीची आहे. या मार्गिकेवर 19 स्थानके आहेत. सुमारे 10,986 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात मंडाळे ते डायमंड गार्डन चेंबूर मार्गिका होणार आहे. ही मार्गिका 5.3 किलोमीटर लांबीची असून यावर लवकरच मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मंडाळे, मानखउर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक, डायमंड गार्डन या स्थानकांवरून मेट्रो धावेल.
advertisement
सीएमआरएसकडून अंतिम प्रमाणपत्र
रेल्वेच्या सीएमआरएस पथकाने पहिल्या टप्प्यातील मार्गावर 2 जुलै ते 4 जुलै या कालावधीत तीन दिवस प्राथमिक तपासणी केली होती. तेव्हा मेट्रो मार्गिकेच्या कामासंदर्भात काही सूचना देखील केल्या होत्या. त्यानुसार आता मेट्रोची कामे आणि मार्गिकेच्या सर्व चाचण्या पूर्ण केल्या जातील. तसेच मार्गिका सुरु करण्यापूर्वी सीएमआरएसकडून अंतिम तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर मेट्रो सुरु करण्यासाठी अंतिम प्रमाणपत्र दिले जाईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
advertisement
काम पूर्ण होण्यास 3 वर्षांचा विलंब
दरम्यान, एमएमआरडीएच्या यापूर्वीच्या नियोजनानुसार 'मेट्रो 12 बी'चे काम ऑक्टोबर 2022 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कंत्राटदारांनी वेळेत कामे न केल्याने एमएमआरडीएला तीन पॅकेजमधील कंत्राटदार बदलावे लागले. यातील दोन पॅकेजमधील कंत्राटदारांची 2021 मध्ये नियुक्ती केली होती. बीकेसी एमटीएनएल ते चेंबूर डायमंड गार्डन या पॅकेज 102 मध्ये तब्बल दोन वर्षांनी म्हणजेच मार्च 2022 मध्ये कंत्राटदाराची नियुक्ती झाली. त्यामुळे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा विलंब झाला आहे. मात्र, आता लवकरच या मार्गावरून मेट्रो धावणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 8:56 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मंडाळे ते चेंबूर मेट्रोबाबत महत्त्वाचं अपडेट, कधी सुरू होणार?