Railway News : लोकल प्रवाशांसाठी गुड न्यूज, पनवेल- बोरिवली-वसई कॉरिडॉर मंजूर; रेल्वेचा सर्वात मोठा प्रकल्प

Last Updated:

Panvel- Borivali- Vasai Suburban Corridor : हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी आहे. लवकरच पनवेल- बोरिवली- वसई लोकल ट्रेन कॉरिडॉर सुरू होणार आहे. लवकरच हा लोकल ट्रेन कॉरडॉर प्रत्यक्षात येणार आहे.

News18
News18
मुंबई आणि मुंबई उपनगर शहरांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी आहे. लवकरच पनवेल- बोरिवली-वसई लोकल ट्रेन कॉरिडॉर सुरू होणार आहे. लवकरच हा लोकल ट्रेन कॉरिडॉर प्रत्यक्षात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने या महत्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिल्यामुळे लाखो प्रवाशांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. या मार्गामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे थेट रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
हार्बर रेल्वेवरील प्रवाशांना आता पश्चिम रेल्वेवर प्रवास करणं अधिकच सोप्प झालेलं आहे. या मार्गामुळे ते आता थेट प्रवास करू शकणार आहेत. मुख्य बाब म्हणजे, प्रवाशांना कुर्ला किंवा वडाळा येथे गाडी बदलण्याच्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP- 3B) अंतर्गत विकसित केला जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना आणि नवी मुंबईकरांना प्रवास करणं फार दिलासादायक झालं असून दररोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचाही वेळ अधिक वाचणार आहे. पश्चिम उपनगरातील प्रवाशांनाही हा मार्ग खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण आता ते पनवेलहून थेट गोवा किंवा पुण्याला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे पकडू शकतील.
advertisement
या प्रवासामुळे प्रवाशांच्या वेळ, पैसा आणि मेहनत या तिघांचीही बचत होणार आहे. सध्या प्रवासी पनवेलहून गोरेगावपर्यंत थेट प्रवास करू शकत आहे. पण आता या नवीन मार्गामुळे पनवेलहून थेट बोरिवलीहून वसई- विरार असा प्रवास करणं अधिकच सोप्पं होणार आहे. 69.23 किमी लांबीचा पनवेल- बोरिवली- वसई हा उपनगरीय लोकल रेल्वे कॉरिडॉर असून यासाठी 12,710 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पनवेलपासून सुरू होणारा हा मार्ग पुढे बोरिवलीमार्गे पुढे वसई आणि विरारला जाणार आहे. 19 स्थानकांचा हा संपूर्ण प्रवास असणार आहे. यामध्ये, भिवंडी रोड, नवी डोंबिवली, कोपर, तळोजा पांचंद, कळंबोली आणि बोरिवली अशी स्थानके असणार आहेत.
advertisement
या मार्गाचा प्रामुख्याने भिवंडी परिसरातील वस्त्रोद्योगासाठी काम करणाऱ्या कामगारांना विशेष फायदा होईल. हजारो कामगारांना कमी वेळेत प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. याशिवाय नवी मुंबई, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील वाढणारे औद्योगिक प्रकल्प या नव्या मार्गामुळे अधिक गतिमान होतील. परिणामी रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि आर्थिक व्यवहार अधिक वेगाने होतील. मुंबई आणि मुंबई उपनगर शहरांतर्गत वाढती लोकसंख्या आणि त्यासोबत प्रवासी ताण लक्षात घेता हा नवीन कॉरिडॉर अत्यावश्यक ठरत आहे. यामुळे त्या मार्गावरील ताण कमी होईल आणि रेल्वेसेवा अधिक सुरळीत- नियोजनबद्ध करता येईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Railway News : लोकल प्रवाशांसाठी गुड न्यूज, पनवेल- बोरिवली-वसई कॉरिडॉर मंजूर; रेल्वेचा सर्वात मोठा प्रकल्प
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement