Beed Farmer: वय अवघे 19 वर्ष कमाई मात्र लाखात, बीडमधील शेतकरी नवीन पिढीसाठी ठरतोय आदर्श

Last Updated:

Beed Farmer: शेतीची आवड असलेला हनुमान शैक्षणिक वाटचालीसोबतच स्वतःच्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहे.

+
Beed

Beed Farmer: वय अवघे 19 वर्ष कमाई मात्र लाखात, बीडमधील शेतकरी नवीन पिढीसाठी ठरतोय आदर्श

बीड: सध्याच्या काळात अनेकांना शेती हा व्यवसाय कमीपणाचा वाटतो. बहुतांशी तरुण वडिलोपार्जित शेतीकडे पाठ फिरवून नोकरी करण्यावर भर देत आहेत. मात्र, बीड जिल्ह्यातील टालेवाडी या छोट्या गावात राहणारा हनुमान वानखेडे हा 19 वर्षांचा तरुण अनेक शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे. शेतीची आवड असलेला हनुमान शैक्षणिक वाटचालीसोबतच स्वतःच्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहे. समवयस्क तरुण खेळ, मोबाईल आणि इतर मौजमजेवर भर देत असताना हनुमान शेतीमध्ये रमत आहे. त्याने आतापासून शेती तंत्रज्ञान, नवीन पद्धती आणि आर्थिक व्यवस्थापन यांचा अभ्यास सुरू केला आहे.
हनुमानच्या घरी एक एकर शेती आहे. या शेतीत तो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध पिकांची लागवड करतो. शेतीच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा तो आधुनिक, वैज्ञानिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करतो. त्याच्या प्रयत्नामुळे झेंडूच्या एकाच सीझनमध्ये त्याला 4 ते 5 लाख रुपयांची कमाई झाली आहे. हनुमान आपल्या शेतीमध्ये भाज्या, फळे आणि इतर चांगलं उत्पन्न देणारी पिकं लावतो.
advertisement
हनुमान वानखेडेने सांगितलं की, शेती हा केवळ व्यवसाय नसून ते एक विज्ञान आहे. त्यासाठी योग्य ज्ञान आणि मेहनत लागते. हनुमान आत्मविश्वासाने इतर स्थानिक शेतकर्‍यांना देखील आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती देतो. स्वतःचा व्यवसाय वाढवत असताना गावातील इतर शेतकऱ्यांनाही फायदा व्हावा, अशी त्याची इच्छा आहे.
advertisement
हनुमानच्या यशोगाथेमुळे टालेवाडी गावातील तरुण पिढीमध्ये एक नवी प्रेरणा निर्माण झाली आहे. शेती करण्यात काही अर्थ उरला नाही, असं मानणाऱ्या अनेकांना हनुमानने आपले विचार बदलण्यास भाग पाडलं आहे. त्याच्या गावातील अनेक शेतकरी त्याच्या मार्गदर्शनाखाली शेतीच्या नवीन पद्धती अवलंबण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे गावातील शेतीत मोठा बदल दिसून येत आहे. हनुमान म्हणाला, "शेती फक्त परंपरेवर नाही तर विज्ञानावर आधारित असायला हवी. नव्या पिढीला शेतीकडे आकर्षित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचं आहे."
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed Farmer: वय अवघे 19 वर्ष कमाई मात्र लाखात, बीडमधील शेतकरी नवीन पिढीसाठी ठरतोय आदर्श
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement