GGMC Mumbai Recruitment 2025 : 10 वी पास उमेदवारांनी नोकरीची ही संधी सोडूच नका, वैद्यकीय महाविद्यालयात मेगाभरती

Last Updated:

GGMC Mumbai Recruitment 2025 : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नोकरीची संधी आहे. 'गट- ड'मध्ये 211 पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. अनेक तरूण सरकारी नोकरीच्या संधीमध्ये असताना ही संधी तरूणांना मिळालेली आहे.

GGMC Mumbai Recruitment 2025 : 10 वी पास उमेदवारांनी नोकरीची ही संधी सोडूच नका, 211 पदांसाठी वैद्यकीय महाविद्यालयात मेगाभरती
GGMC Mumbai Recruitment 2025 : 10 वी पास उमेदवारांनी नोकरीची ही संधी सोडूच नका, 211 पदांसाठी वैद्यकीय महाविद्यालयात मेगाभरती
ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नोकरीची संधी आहे. 'गट- ड'मध्ये 211 पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. अनेक तरूण सरकारी नोकरीच्या संधीमध्ये असताना ही संधी तरूणांना मिळालेली आहे. अलीकडेच जीजीएमसी मुंबई कॉलेजमधील नोकर भरती जाहीर झालेली आहे. नोकर भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता किती आहे? उमेदवारांची वयोमर्यादा किती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला जाणून घ्यायची आहेत.
ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई अंतर्गत “गट ड (वर्ग-४)” पदांच्या एकूण 211 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणार्‍या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2025 आहे. अर्ज करण्याची तारीख 3 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. https://ggmcjjh.com/ या वेबसाईटवरून तुम्ही अर्ज करू शकता. सेंट जॉर्जेस रूग्णालय, नागरी स्वास्थ केंद्र, परिचार्या शिक्षण संस्था, शासकीय दंत महाविद्यालय, आयुष संचालनालय, पोतदार रूग्णालय, रा. आ. पोद्दार वैद्यक हॉस्पिटल अशा ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत.
advertisement
सेंट जॉर्जेस रूग्णालयात 91 पदे, वांद्राच्या नागरी स्वास्थ केंद्रात 6 पदे, परिचार्या शिक्षण संस्थेमध्ये 11 पदे, शासकीय दंत महाविद्यालय आणि रूग्णालय 21, आयुष संचालनालय 6, पोतदार रूग्णालय 45, रा. आ. पोद्दार वैद्यक हॉस्पिटल15 अशा वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2025 असून रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत अर्जदार नोकरीसाठी अर्ज करू शकतात. परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीनेच होणार अद्याप जीजीएमसी मुंबई कॉलेजने परिक्षेची तारीख जाहीर केलेली नाही. वयोमर्यादा जास्तीत जास्त 38 वर्षे असून कमीत कमी वयोमर्यादा 18 इतकी आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून निवड प्रक्रियेसाठी संगणक आधारित चाचणी होणार आहे.
advertisement
15000 ते 47600 पर्यंत वेतन निवड प्रक्रिया झाल्यानंतर मिळणार आहे. पण पोतदार रूग्णालयामध्ये, तीन वर्गांमध्ये नोकर भरती केले जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी वेतन वेगवेगळं असणार आहे, त्यासाठी तुम्हाला जाहिरातीची PDF एकदा वाचावी लागेल. अर्ज शुल्काबद्दल सांगायचं तर, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रूपये अर्ज शुल्काची फी आहे. राखीव प्रवर्गामध्ये (मागास प्रवर्गाला आणि आर्थिकदृटया दुर्बल घटकांना) 900 रूपये अर्ज शुल्काची फी असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
GGMC Mumbai Recruitment 2025 : 10 वी पास उमेदवारांनी नोकरीची ही संधी सोडूच नका, वैद्यकीय महाविद्यालयात मेगाभरती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement