Special Trains : रेल्वेचा मोठा निर्णय! नवरात्र अन् दिवाळीसाठी पुण्याहून धावणार 300 विशेष गाड्या; कोणत्या मार्गावर किती ट्रेन? वाचा सविस्तर

Last Updated:

Special Trains for Diwali And Navratri : नवरात्र ते दिवाळी या कालावधीत पुणेकरांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, पुणेकरांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

दिवाळी आणि नवरात्रीसाठी विशेष गाड्या
दिवाळी आणि नवरात्रीसाठी विशेष गाड्या
पुणे : दिवाळी आणि छटपूजा, नवरात्री तसेच दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पुणेकरांना नागपूर, लातूर तसेच उत्तर भारतातील विविध प्रमुख शहरांमध्ये सहज प्रवास करता यावा यासाठी एकूण 300 विशेष गाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष गाड्यांमुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार असून, गर्दीचे व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे.
या विशेष गाड्यांपैकी केवळ नागपूर आणि लातूर मार्गावर 94 फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. पुणे, हडपसर आणि खडकी स्थानकांहून या गाड्या सुटणार आहेत. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन या गाड्यांचे थांबे दौंड, मनमाड, भुसावळ, झाशी, गोरखपूर अशा महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तसेच उत्तर भारतातील शहरांना पुणेकरांना सोयीस्करपणे पोहोचणे शक्य होणार आहे.
advertisement
26 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबर या कालावधीत या गाड्या धावणार असून, दिवाळीपूर्वी आणि छटपूजेच्या काळात या गाड्यांमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल. सणासुदीच्या काळात नियमित गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता विशेष गाड्या उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांच्या अडचणी कमी होतील.
याव्यतिरिक्त काही साप्ताहिक सुपरफास्ट गाड्याही या कालावधीत धावणार आहेत. या गाड्या वेगवान असल्यामुळे लांबच्या प्रवासासाठी वेळ वाचणार आहे. दिवाळीच्या काळात अनेक कुटुंबे गावाकडे जाण्याचा बेत आखतात. त्यामुळे लातूर, नागपूरसारख्या शहरांमध्ये जाणाऱ्या गाड्यांना प्रचंड मागणी असते. रेल्वे प्रशासनाने हे लक्षात घेऊन गाड्यांची संख्या वाढवली आहे.
advertisement
याशिवाय, बस प्रवास करणाऱ्यांसाठीही विशेष बस सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. रेल्वे आणि बस सेवा या दोन्ही एकत्रितपणे सुरू असल्याने प्रवाशांना दुहेरी सोय होणार आहे. पुण्यातून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर गोरखपूर, झाशी यांसारख्या उत्तर भारतातील ठिकाणी पोहोचणे सुलभ होणार आहे.
हे ही वाचा: Festival Special Train : दिवाळीत गावी जाणं होणार अधिक सोयीस्कर; पुण्यातून धावणार 'या' विशेष गाड्या; वाचा वेळापत्रक
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळेत आरक्षण करून तिकिटे घेण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन बुकिंगसह स्थानकांवर तिकिट खिडक्या उघडण्यात येणार आहेत. गर्दीचा विचार करून अतिरिक्त डबेही लावण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
दिवाळी आणि छटपूजा हे भारतीय कुटुंबासाठी महत्त्वाचे सण असल्याने नोकरी, शिक्षण किंवा कामानिमित्ताने शहरात राहणारे अनेकजण या काळात गावाकडे परततात. त्यामुळे रेल्वेच्या या निर्णयामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणेकरांना सुरक्षित, सोयीस्कर व वेळेवर प्रवासाची हमी मिळणार असून, सणासुदीचा आनंद अधिक वाढणार आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Special Trains : रेल्वेचा मोठा निर्णय! नवरात्र अन् दिवाळीसाठी पुण्याहून धावणार 300 विशेष गाड्या; कोणत्या मार्गावर किती ट्रेन? वाचा सविस्तर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement