Numerology: अजूनही चाचपडताय! जन्मतारखेनुसार करिअर-व्यवसायाचा मार्ग निवडा; नाव अन् पैसा दोन्ही मिळेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi: अनेकजण कमी वयात प्रगतीच्या मार्गावरून धावू लागतात तर काहीजण खूप काळ योग्य वाट शोधण्यामध्ये घालवतात. म्हणजे करिअरमध्ये चाचपड राहतात. त्यामुळे साहजिकच आर्थिक समस्याही येतात. खरंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर व्हायला हवं, म्हणजे आयुष्य सुखात जातं. परंतु बऱ्याचदा आपल्याला आपल्या क्षमता अचूक ओळखता येत नाहीत. कोणत्या जन्मतारखांच्या व्यक्तींमध्ये कोणत्या क्षेत्रात करियर करण्याची क्षमता असते, याबाबत अंकशास्त्रात सांगितलेली माहिती जाणून घेऊया.
advertisement
1, 3 आणि 5 मूलांक असलेल्या व्यक्तींमध्ये उत्तम नेतृत्त्व गुण असतात. त्या स्वतंत्र विचारांच्या, आत्मविश्वासू आणि महत्त्वाकांक्षी असतात. त्यामुळे त्या राजकीय, कला क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. त्या उत्तम व्यवसायही करू शकतात. त्यांच्याकडे इतरांवर प्रभाव निर्माण करण्याची क्षमता असते. याच गुणाच्या जोरावर त्या उत्तम नेतृत्त्व करण्यास सक्षम ठरतात.
advertisement
2, 4 किंवा 6 मूलांक असलेल्या व्यक्ती इतरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या, जबाबदारी स्वीकारणाऱ्या आणि संवेदनशील असतात. त्या शैक्षणिक किंवा आरोग्य क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. या व्यक्ती भावनिक असतातच, शिवाय आपल्या धेय्याप्रति प्रामाणिकही असतात. आपल्या याच गुणांच्या जोरावर त्या शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातून यशस्वीरित्या मनासारखी समाजसेवा करू शकतात.
advertisement
advertisement
त्यांच्यात संशोधन करण्याची तीव्र इच्छा आणि गुण असतात. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये त्या यशस्वी होऊ शकतात. ज्योतिषी अखिलेश यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, आपल्यातील क्षमतांचा वापर करून योग्य क्षेत्रात काम केल्यास निश्चितच यश मिळू शकतं आणि त्या जोरावर आपण आपलं आयुष्य ऐश्वर्यात जगू शकतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)