संजूसह रिंकु OUT, कुलदीप अन् जितेश IN, आशिया कपच्या पहिल्याच मॅचआधी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन लीक!

Last Updated:

India Playing 11 Asia Cup 2025 : टी- ट्वेंटी नंबर-2 फलंदाज तिलक वर्माला चौथ्या क्रमांकावर संधी मिळेल. त्यानंतर अष्टपैलू हार्दिक पंड्या खेळताना दिसेल. तसे, कधीकधी अक्षर पटेल देखील या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो.

India Playing 11 Asia Cup 2025
India Playing 11 Asia Cup 2025
Team India Playing 11 vs UAE : कालपासून आशिया कपचा नारळ फुटला आहे. तर आजपासून टीम इंडियाचे सामने खेळवले जातील. टीम इंडियाचा पहिला सामना हा यजमान युएईविरुद्ध खेळवला जाईल. लीग टप्प्यात भारतीय संघाचा सामना यूएई, पाकिस्तान आणि ओमानशी होईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बुधवारी पहिल्या सामन्यात यूएईशी सामना करेल. हा सामना भारतासाठी केवळ स्पर्धेची सुरुवातच नाही तर 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा सराव असणार आहे.

अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला कोण?

मिडिया रिपोर्टनुसार, बुधवारी युएईविरुद्ध होणाऱ्या सामन्यात चायनामन स्पिनर कुलदीप यादव, फिनिशर रिंकू सिंग आणि विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन हे प्लेइंग इलेव्हनचा भाग नसतील. तसेच हर्षित राणालाही संधी मिळणार नाही. उपकर्णधार शुभमन गिल आणि टी-ट्वेंटी नंबर-1 फलंदाज अभिषेक शर्मा डावाची सुरुवात करतील. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल.
advertisement

तिलक वर्मा कुठं खेळणार? 

टी- ट्वेंटी नंबर-2 फलंदाज तिलक वर्माला चौथ्या क्रमांकावर संधी मिळेल. त्यानंतर ऑलराऊंडर हार्दिक पंड्या खेळताना दिसेल. तसे, कधीकधी अक्षर पटेल देखील या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग आहेत. या तिघांना साथ देण्यासाठी अक्षर पटेल, हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे देखील आहेत.
advertisement

UAE विरुद्ध टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन -

शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह और अर्शदीप सिंह.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
संजूसह रिंकु OUT, कुलदीप अन् जितेश IN, आशिया कपच्या पहिल्याच मॅचआधी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन लीक!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement