Pune Crime : मावळात पुन्हा रक्तरंजित थरार! बहिणीला घरी सोडलं अन् तरुणावर भावांनी धाडधाड झाडल्या गोळ्या, नेमकं काय घडलं?

Last Updated:

Midnight firing in Vadgaon Maval : मावळ तालुक्यात रात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून पेटलेला राग इतका वाढला की गोळीबारापर्यंत मामला गेला.

News18
News18
पुणे : पुणेकरांमध्ये आता एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे ''शहरात नेमकं चाललंय तरी काय?'' देशाची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून लौकिक मिळवलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांत सतत गोळीबाराच्या घटना घडताना दिसत आहेत. नुकत्याच नाना पेठेत आंदेकर टोळीने आयुष कोमकर याची गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्येमुळे संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली होती. त्याची धाक अजून संपला नाही तोच मावळ परिसरातून पुन्हा एक गोळीबार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
शाळेतल्या किरकोळ वादातून पेटली खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला शाळेतून सोडताना किरकोळ वाद निर्माण झाला. फिर्यादी अक्षय एकनाथ मोहिते यांचा चुलत भाऊ शाळेतून आरोपींच्या परिचयातील एका विद्यार्थिनीला घरी सोडून आला होता. त्यावरूनच आरोपी संतापले. या कारणावरून सौरभ रोहिदास वाघमारे, अभिजीत राजाराम ओव्हाळ, रणजित बाळासाहेब ओव्हाळ आणि प्रथमेश दिवे यांनी शाळेबाहेरून अक्षयच्या भावाला स्कॉर्पिओ गाडीत बसवून मारहाण केली. या घटनेनंतर दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली.
advertisement
एकविरा चौकात पुन्हा धुमश्चक्री
प्रसंग इथेच थांबला नाही. त्यानंत संध्याकाळी साडेसहा वाजता अक्षय मोहिते आपल्या मित्रांसोबत एकविरा चौकात बसलेला असताना आरोपी पुन्हा तेथे आले. रणजित ओव्हाळ आणि प्रथमेश दिवे यांनी शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर सौरभ वाघमारे आणि अभिषेक ओव्हाळ मोटरसायकलवर येऊन थेट पिस्तूल बाहेर काढले. सौरभ वाघमारे याने अक्षय मोहिते यांच्या दिशेने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला.मात्र, ती फायर झाली नाही. कारतूस खाली पडल्याने तो प्रयत्न फसला. पण आरोपीने हार मानली नाही. त्याने पुन्हा गोळीबार केला, सुदैवाने ती गोळी कोणीही लागली नाही. अक्षय तत्परतेने पळून जवळच्या सोसायटीत शिरल्याने त्याचा जीव वाचला.
advertisement
पोलिसांची झटपट कारवाई
या प्रकरणाची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलिसांनी तातडीने हालचाल केली. पथके तयार करून छापा टाकत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये अभिषेक राजाराम ओव्हाळ (28), रणजित बाळासाहेब ओव्हाळ (23) आणि प्रथम सुरेश दिवे (23) यांचा समावेश आहे. मुख्य आरोपींपैकी एक अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. वडगाव मावळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वेगाने सुरू आहे.
advertisement
परिसरात तणाव, पण परिस्थिती नियंत्रणात
या गोळीबारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण काही प्रमाणात कमी झाले आहे. अल्पशा कारणावरून घडलेला हा गोळीबार केवळ धक्कादायकच नाही, तर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : मावळात पुन्हा रक्तरंजित थरार! बहिणीला घरी सोडलं अन् तरुणावर भावांनी धाडधाड झाडल्या गोळ्या, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement