वर्कआउट करूनही वजन कमी होत नाही? मग 'या' 6 चुक तर तुम्ही करत नाही ना?

Last Updated:
खरं तर यामागे काही लहान पण महत्त्वाच्या सवयी कारणीभूत ठरतात. तुम्ही तर त्या सवयी फॉलो करत नाही ना?
1/9
आजकाल अनेक लोक वजन कमी करण्यासाठी व्यायामशाळेत जातात, डाएट फॉलो करतात, रोज व्यायाम करून घाम गाळतात. पण असं असूनही अनेकदा वजन कमी होण्याऐवजी वाढताना दिसतं. अशावेळी मनात प्रश्न येतो इतका प्रयत्न करूनही परिणाम का दिसत नाही? खरं तर यामागे काही लहान पण महत्त्वाच्या सवयी कारणीभूत ठरतात. तुम्ही तर त्या सवयी फॉलो करत नाही ना?

advertisement
2/9
1. वर्कआउटनंतर जास्त खाणंव्यायामानंतर भूक लागणं नैसर्गिक आहे. पण काही लोक या वेळेस जास्त खातात. त्यामुळे शरीरात अपेक्षेपेक्षा जास्त कॅलरी जमा होते आणि वजन कमी होण्याऐवजी वाढू लागतं.
1. वर्कआउटनंतर जास्त खाणं
व्यायामानंतर भूक लागणं नैसर्गिक आहे. पण काही लोक या वेळेस जास्त खातात. त्यामुळे शरीरात अपेक्षेपेक्षा जास्त कॅलरी जमा होते आणि वजन कमी होण्याऐवजी वाढू लागतं.
advertisement
3/9
2. फक्त कार्डिओवर भर देणंकार्डिओ व्यायामामुळे फॅट बर्न होतो, पण स्नायू (मसल्स) तयार होत नाहीत. स्नायू वाढले की शरीर जास्त कॅलरी जाळतं. म्हणून वेट ट्रेनिंग किंवा मसल्स बिल्डिंगचे व्यायामही फिटनेस रूटीनमध्ये असणं गरजेचं आहे.
2. फक्त कार्डिओवर भर देणं
कार्डिओ व्यायामामुळे फॅट बर्न होतो, पण स्नायू (मसल्स) तयार होत नाहीत. स्नायू वाढले की शरीर जास्त कॅलरी जाळतं. म्हणून वेट ट्रेनिंग किंवा मसल्स बिल्डिंगचे व्यायामही फिटनेस रूटीनमध्ये असणं गरजेचं आहे.
advertisement
4/9
3. पुरेशी झोप न घेणंशरीराला रिकव्हरीसाठी झोप खूप महत्त्वाची असते. कमी झोपेमुळे मेटाबॉलिझम मंदावतो आणि ‘स्ट्रेस हार्मोन’ वाढतो, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.
3. पुरेशी झोप न घेणं
शरीराला रिकव्हरीसाठी झोप खूप महत्त्वाची असते. कमी झोपेमुळे मेटाबॉलिझम मंदावतो आणि ‘स्ट्रेस हार्मोन’ वाढतो, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.
advertisement
5/9
4. पाणी कमी पिणंशरीरात डिहायड्रेशन झाल्यास मेटाबॉलिझम कमी होतो. पाणी शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतं आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो.
4. पाणी कमी पिणं
शरीरात डिहायड्रेशन झाल्यास मेटाबॉलिझम कमी होतो. पाणी शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतं आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो.
advertisement
6/9
5. प्रोटीनची कमतरतावर्कआउटनंतर शरीराला सर्वाधिक गरज प्रोटीनची असते. पण अनेकदा डाएटमध्ये पुरेसं प्रोटीन घेतलं जात नाही. यामुळे स्नायूंची योग्य वाढ होत नाही आणि वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं.
5. प्रोटीनची कमतरता
वर्कआउटनंतर शरीराला सर्वाधिक गरज प्रोटीनची असते. पण अनेकदा डाएटमध्ये पुरेसं प्रोटीन घेतलं जात नाही. यामुळे स्नायूंची योग्य वाढ होत नाही आणि वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं.
advertisement
7/9
6. रोज वजन तपासून निराश होणंवर्कआउटच्या सुरुवातीला स्नायूंचं वजन वाढल्यामुळे काट्यावर वजन जास्त दिसू शकतं. पण याचा अर्थ असा नाही की फॅट कमी होत नाहीये. त्यामुळे धीर ठेवा आणि नियमित प्रयत्न सुरू ठेवा.
6. रोज वजन तपासून निराश होणं
वर्कआउटच्या सुरुवातीला स्नायूंचं वजन वाढल्यामुळे काट्यावर वजन जास्त दिसू शकतं. पण याचा अर्थ असा नाही की फॅट कमी होत नाहीये. त्यामुळे धीर ठेवा आणि नियमित प्रयत्न सुरू ठेवा.
advertisement
8/9
जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल, तरीही वजन कमी होत नसेल तर या छोट्या सवयींकडे लक्ष द्या. योग्य झोप, संतुलित आहार, मसल्स ट्रेनिंग, पुरेसे पाणी आणि संयम या गोष्टींच्या मदतीनेच फिटनेसचं उद्दिष्ट गाठता येईल.

9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement