Vice President CP Radhakrishnan : राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतिपदाची शपथ, PM मोदींसह धनगडांसह कोण उपस्थित?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Vice President CP Radhakrishnan : देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
नवी दिल्ली : देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी त्यांना उपराष्ट्रपतिपदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, जगदीप धनगड उपस्थित होते. उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनगड पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहिले.
advertisement
मंगळवारी झालेल्या उपराष्ट्रपतिपदच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी विजय मिळवला. आज त्यांनी राष्ट्रपती भवनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राधाकृष्णन यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदाची शपथ दिली. आजच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.
advertisement
#WATCH दिल्ली: सी.पी. राधाकृष्णन ने उपराष्ट्रपति पद की शपथ ली।
(वीडियो: डीडी) pic.twitter.com/p3fS9mXDje
— ANI_HindiNews (@AHindinews) September 12, 2025
उपराष्ट्रपतींनी बोलावली बैठक...
उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर सी पी राधाकृष्णन यांनी बैठक बोलावली आहे. राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांनी ही बैठक बोलावली. आज दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास राज्यसभेच्या सर्व गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सर्व गटनेत्यांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
दरम्यान, राधाकृष्णन यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे नवीन नियुक्ती होईपर्यंत महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.
इतर संबंधित बातमी:
Location :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
September 12, 2025 11:05 AM IST
मराठी बातम्या/देश/
Vice President CP Radhakrishnan : राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतिपदाची शपथ, PM मोदींसह धनगडांसह कोण उपस्थित?