Indian Railway : तुम्हाला सारखाच वाटतो, पण ट्रेनचे 11 प्रकारचे हॉर्न, समजून घ्या प्रत्येकाचा अर्थ

Last Updated:
Train horn meaning : रेल्वे प्रवासादरम्यान आजही आपण सर्वजण ट्रेनचे हॉर्न ऐकतो. पण या हॉर्नचा नेमका अर्थ काय? याचा विचार आपण करतच नाही. पण याचा अर्थ प्रवासी म्हणून तुम्हालाही माहिती असायला हवा. 
1/13
प्लॅटफॉर्मजवळ ट्रेन येत असताना आणि ट्रेन सुटताना त्याचा हॉर्न तुम्ही ऐकता. याशिवाय ट्रेन चालू असताना मधे मधेसुद्धा हॉर्न वाजवला जातो. या हॉर्नच्या माध्यमातून ट्रेनचा चालक, गार्ड, प्रवासी यांच्यात ताळमेळ साधला जातो. 

advertisement
2/13
तुम्ही जर नीट ऐकलं तर ट्रेनचा हॉर्न सारखा नसतो. प्रत्येक हॉर्न वेगवेगळ्या पद्धतीने वाजवला जातो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, ट्रेनचे तब्बल 11 प्रकारे हॉर्न वाजवले जातात. याच वेगवेगळा अर्थ आहे. 

3/13
एक छोटा हॉर्न : ट्रेन धुण्यासाठी आणि साफसफाईसाठी यार्डात जाण्यास तयार आहे. यानंतर ती पुन्हा प्रवाशांसह पुढील प्रवासासाठी रवाना होईल.

4/13
दोन छोटे हॉर्न : ट्रेन प्रवासासाठी तयार असताना हा हॉर्न वाजवला जातो. लोकोपायलट गार्डना संकेत देतो की, ट्रेन प्रवासासाठी तयार आहे, पुढे जाण्यासाठी सिग्नल द्या.

5/13
तीन छोटे हॉर्न : आणीबाणीच्या स्थितीत वाजवतात. ड्रायव्हरने इंजिनवरील नियंत्रण गमावलं आहे. म्हणून तो या हॉर्नद्वारे गार्डना संकेत देतो की त्यांनी व्हॅक्यूम ब्रेक त्वरित खेचावा. अशी घटना क्वचितच घडते आणि हा ब्रेकदेखील आपत्कालीन स्थितीतच वापरला जातो.

6/13
चार लहान हॉर्न : ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड असताना वाजत. जर चालत असलेली ट्रेन थांबली आणि ड्रायव्हरने चार वेळा लहान हॉर्न वाजवला तर तो गार्डला हा इशारा देत आहे की, इंजिन खराब झाल्यामुळे ट्रेन पुढे जाऊ शकत नाही.

7/13
एक लांब आणि एक लहान हॉर्न : ट्रेन चालवण्यापूर्वी किंवा प्रवासाला निघण्यापूर्वी वाजवतात. ब्रेक पाईप सिस्टम तपासण्यासाठी लोको पायलट एक लांब आणि एका लहान हॉर्नद्वारे गार्डला सूचित करतो. यानंतर गार्ड ब्रेक ठीक काम करत आहे की नाही, हे तपासतात.

8/13
दोन लहान आणि एक लांब हॉर्न : या हॉर्नने ड्रायव्हर गार्डला इंजिनवर नियंत्रण ठेवण्यास सूचित करतो. जर कोणी ट्रेनची इमर्जन्सी साखळी ओढली किंवा गार्डने व्हॅक्यूम ब्रेक लावला तरच हा हॉर्न वाजवला जातो.

9/13
दोन लांब आणि एक लहान हॉर्न : प्रवासादरम्यान हा हॉर्न ऐकला तर समजून घ्या की ट्रेन ट्रॅक बदलत आहे.

10/13
दोन लांब आणि दोन लहान हॉर्न : मोटरमन गार्डला इंजिनचा ताबा घेण्यास सूचित करतो.

11/13
दोनदा थांबून हॉर्न वाजवणं :  जर ड्रायव्हर जरा थांबून लांब हॉर्न देत असेल तर ट्रेन स्टेशनजवळची क्रॉसिंग पार करणार आहे. या हॉर्नमधून लोको पायलट ट्रॅकच्या सभोवताली असणाऱ्या लोकांना ट्रेन येत असल्याची सूचना देतो.

12/13
सहावेळा छोटा हॉर्न : ट्रेन काही अडचणीत अडकली आहे हे ड्रायव्हर सूचित करतो. याद्वारे तो मदतीसाठी जवळच्या स्टेशनला मदत मागतो.

13/13
बराच वेळ वाजणारा लांब हॉर्न : जर हा हॉर्न कोणत्याही स्टेशनवर ऐकू आला तर याचा अर्थ असा ती ट्रेन त्या स्थानकावर थांबणार नाही. 

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement