Pune Rain Alert: तुफान आलंया! पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार, 5 जिल्ह्यांना इशारा
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मान्सूनच्या पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. यातच राज्यात पावसाने जोर धरला आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 8.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 29.2 अंश सेल्सिअसवर स्थिर राहिला. पुढील 24 तासात पुणे जिल्ह्यात तापमान स्थिर राहणार असले तरीही पुणे जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. सोमवारी पुणे घाटमाथ्यास जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र पुढील 24 तास कोल्हापूर जिल्ह्यासाठी सतर्कतेचे ठरणार आहेत. आज कोल्हापूर जिल्ह्यात गडगडाटी वादळासह मध्यम पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. कोल्हापूरसह कोल्हापूर घाटमात्यास सतर्कतेचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
advertisement
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच 29.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात विजांसह पावसाची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 28 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील. जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात 14 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 30.2 अंश सेल्सिअस राहील. आज सातारा जिल्ह्यात विजांसह 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगवान वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सातारा घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
advertisement









