Marathwada Weather: विजा कडकडणार, पाऊस कोसळणार, मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
भारतीय हवामान विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नागरिकांनी सुरक्षित राहावे. जर विजांचा कडकडाट आणि वाऱ्यांची गती वाढली, तर घरातच राहणे आणि उघड्या जागी जाणे टाळणे आवश्यक आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील बहुतांश भागांमध्ये पाऊस सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भासह मराठवाड्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने आज 15 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या अलर्टमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह विजांच्या कडकडाटासह वाऱ्यांची शक्यता असण्याचा अंदाज आहे. अलर्टमध्ये सांगण्यात आले आहे की या कालावधीत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement