एसटीचं चाक जास्त फिरणार! दिवाळीत प्रवाशांना होणार नाही कसलाच त्रास, महामंडळाने काढला 'हा' आदेश

Last Updated:

ST Bus Services : 18 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) विशेष...

ST Bus Services
ST Bus Services
ST Bus Services : 18 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) विशेष नियोजन केले आहे. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत राज्यभरात 902 जादा बसफेऱ्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे एसटीची चाके तब्बल 2 लाख 83 हजार 882.1 किलोमीटर अधिक फिरणार आहेत.
सर्वाधिक जादा फेऱ्या पुणे प्रदेशात
या जादा बसफेऱ्यांपैकी सर्वाधिक 292 फेऱ्या पुणे प्रदेशातून मंजूर करण्यात आल्या आहेत. तर, नागपूर प्रदेशात सर्वात कमी, म्हणजे केवळ 4 जादा फेऱ्या चालवल्या जातील. या काळात प्रवाशांसाठी सर्व आरक्षण केंद्रे आणि वाहतूक नियंत्रण कक्षात 4 आणि 7 दिवसांचे पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
दिवाळीच्या काळात प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी एकूण 2 हजार 32 चालक आणि वाहक अतिरिक्त सेवा देणार आहेत. या काळात त्यांची सुट्ट्यांवर नियंत्रण आणले जाणार आहे, तर पर्यवेक्षकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तर सुट्ट्याच देऊ नयेत, असे आदेश महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिले आहेत.
advertisement
ST Bus Services
प्रवाशांच्या सोयीसाठी सूचना
महामंडळाची प्रतिमा उंचावण्यासाठी बसस्थानकांचा परिसर, प्रसाधनगृहे, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि बसेस स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, बसस्थानकांचे सुशोभीकरण करून दिवाळीत रोषणाई करण्याचे आदेशही सर्व विभागांना देण्यात आले आहेत, जेणेकरून प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एसटीचं चाक जास्त फिरणार! दिवाळीत प्रवाशांना होणार नाही कसलाच त्रास, महामंडळाने काढला 'हा' आदेश
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement