विजांचा कडकडाट-वाऱ्यांचा कहर, 4 जिल्ह्यांमध्ये अलर्ट, पुढचे 3 दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा येथे ऑरेंज अलर्ट; बीडच्या माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले, ईसापूर रमना गावात शेतकऱ्याला तरुणाने वाचवले.
मुंबई: रविवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसाने रात्रभरात चांगलाच जोर घेतला आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि 50 किमी ताशी वेगाने वारे वाहात असून मुसळधार पाऊस रात्रभर सुरू आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, लोणावळा, खंडाळा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. आणखी तीन तास महत्त्वाचे असून अति मुसळधार पाऊस होईल त्यामुळे नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
पुढील ३ तासांत मुंबई,मुंबई उपनगर,रायगड,ठाणे येथे काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटासह ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे असा इशारा मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. पुढचे तीन ते चार दिवस पुन्हा एकदा अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढचे तीन दिवस मुळधार ते अति मुसळधा पाऊस राहील. त्याच सोबत वादळी वारे आणि विजांचा कडकडाटही असेल. त्यामुळे सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मागच्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अति मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे.
advertisement
विदर्भापासून अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस पडू शकतो. हाय अलर्ट अरबी समुद्रा किनाऱ्यावर जारी करण्यात आला आहे. तर हा परतीचा पाऊस असल्याचंही सांगितलं जात आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत पाऊस हळूहळू पाऊस जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला आजपासून सुरुवात होण्यार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
advertisement
मागच्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे माजलगाव धरणाचे 11दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणक्षेत्रात जोरदार पावसामुळे पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळच्या सुमारास 11 दरवाजे उघडण्यात आले असून सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठी कोणीही जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. पावसाचा फटका रविवारी मनमाडच्या आठवडी बाजार बसला.. पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं. हिंगोलीच्या ईसापूर रमना गावात ओढ्याच्या पुरात शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली. यावेळी एका तरुणाने जीवाची बाजी लाऊन शेतऱ्याला वाचवलंय. शेतकऱ्याला वाचवण्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 7:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विजांचा कडकडाट-वाऱ्यांचा कहर, 4 जिल्ह्यांमध्ये अलर्ट, पुढचे 3 दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा