PAK vs BAN : W,W,W,W,W...23 वर्षांच्या पोरानं पाकिस्तानला रडवलं, पत्यासारखा डाव कोसळला, VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बांग्लादेशच्या या विजयाचा शिल्पकार हा 23 वर्षीय नाहिद राणा ठरला आहे. या एकट्या मुलाने पाकिस्तानला रडकुंडीला आणलं होतं.त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
Nahid Rana picks 5 wicket Video : टी20 वर्ल्डकपच्या समाप्तीनंतर पाकिस्तानी टीम बांग्लादेशच्या दौऱ्यावर गेली आहे. या दौऱ्यातल्या पहिल्याच सामन्यात बांग्लादेशने फक्त 91 बॉलमध्ये सामना जिंकून पाकिस्तानचा 8 विकेटने पराभव केला होता. बांग्लादेशच्या या विजयाचा शिल्पकार हा 23 वर्षीय नाहिद राणा ठरलं आहे. या एकट्या मुलाने पाकिस्तानला रडकुंडीला आणलं होतं.त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर ढाकाच्या शेरे बांग्ला स्टेडिअमवर पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात बांग्लादेश संघाने पाकिस्तानचा डाव 114 धावांवर ऑलआऊट केला होता.त्यामुळे बांग्लादेशसमोर 115 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेशची सूरूवात खराब झाली होती. कारण सैफ हसन 4 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर हंजिद हसन तमिम आणि नजमुल शांतोने बांग्लादेशचा डाव सावरला होता. पण पुढे जाऊन शांतो 27 वर बाद झाला होता. त्यानंतर तांजिद तमीमने शेवटपर्यंत क्रिजवर उभं राहत 42 बॉलमध्ये 67 धावांची खेळी केली होती.त्याच्या या खेळीच्या बळावर बांग्लादेशने वनडे मॅच 15.1 ओव्हर म्हणजेच 91 बॉलमध्ये जिंकली होती.त्यामुळे बांगलादेशने हा सामना 8 विकेटने जिंकून पाकिस्तानचा करेंक्ट कार्यक्रम केला होता.
advertisement
Nahid Rana 7 over 5-24 spell vs Pakistan | 1st ODI, 2026 - Mirpur | Ball By Ball Highlights pic.twitter.com/NLuRZ5a00N
— Danish (@PctDanish) March 11, 2026
23 वर्षीय उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज नाहिद राणा याने त्याच्या सहाव्या एकदिवसीय सामन्यात प्रथम पदार्पण करणारा सलामीवीर साहिबजादा फरहानला बाद केले. त्याने स्फोटक सलामीवीर आफिफ हुसेनला कॅचआऊट केले. फरहान 38 बॉलमध्ये 27 धावा काढून बाद झाला, ज्यामध्ये चार चौकारांचा समावेश होता.
advertisement
फरहान बाद झाला तेव्हा पाकिस्तानची एकूण धावसंख्या 41 होती. नाहिदने त्याचा दुसरा बळी शामल हुसेनच्या रुपात घेतला. जो 4 धावांवर लिटन दासच्या हातात कॅच आऊट झाला. राणाने 18 धावांवर 19 वर्षांखालील स्टार माझ सदाकतला बाद केले, ज्यामुळे त्याचा तिसरा बळी पूर्ण झाला. राणाने त्याचा चौथा बळी म्हणून यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानला बाद केले, तर सलमान आघा पाच धावांवर बाद झाला. राणाने सामन्यात सात षटकांत 24 धावांत 5 बळी घेतले. कर्णधार मेहदी हसन मिराजने तीन बळी घेतले.
advertisement
नाहिद राणा कोण आहे?
2 ऑक्टोबर 2002 रोजी जन्मलेला तरुण खेळाडू नाहिद राणा सध्या त्याच्या स्फोटक वेगामुळे जागतिक क्रिकेटमध्ये
सगळ्यांचे लक्ष वेधतो आहे. 150 किमी/तास पेक्षा जास्त वेगाने धावण्याची क्षमता असलेला राणा 145 किमी/तास वेगाने बॉलिंग करण्यासाठी ओळखला जातो.
विशेष म्हणजे,राणाने जुन्या काळातील पारंपारिक क्रिकेट मार्गाचे अनुसरण करण्याऐवजी त्याच्या क्षमतेच्या आधारे राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. 2024 मध्ये भारताविरुद्धच्या चेन्नई कसोटीत त्याने यशस्वी जयस्वालला 148 किमी/तास वेगाने चेंडू बाद करून आपले कौशल्य दाखवले.
advertisement
नाहिद राणाची क्रिकेट कारकीर्द
नाहिद राणाने 10 कसोटी आणि एक टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. या सामन्यापूर्वी त्याने पाच एकदिवसीय सामन्यात पाच बळी घेतले होते, तर त्याच्या कसोटी बळींची संख्या 27 आहे. राणाने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन बळी घेतले आहेत. राणाने 29 प्रथम श्रेणी सामन्यात 101 बळी घेतले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 9:16 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs BAN : W,W,W,W,W...23 वर्षांच्या पोरानं पाकिस्तानला रडवलं, पत्यासारखा डाव कोसळला, VIDEO









