advertisement

Weather Alert : महाराष्ट्रात उष्णतेचा पारा चढाच, गुरुवारी सूर्य आग ओकणार, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
विशेषतः उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात उष्ण हवामान राहील. महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे.
1/7
महाराष्ट्रात उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला दिसतोय. 12 मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विशेषतः उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात उष्ण हवामान राहील. महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे.

2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील. मुंबईत कमाल 34-38 अंश सेल्सियस तर किमान 24-27 अंश सेल्सियस तापमान राहील. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान राहील. पुण्यात कमाल 35-38 अंश सेल्सियस तर किमान 18-21 अंश सेल्सियस तापमान राहील.

4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमान वाढ पाहायला मिळेल. नाशिकमध्ये दिवसा 34-37 अंश सेल्सियस तर किमान 19-22 अंश सेल्सियस तापमान राहील.

5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल 35-39 अंशांपर्यंत तर किमान 20-23 अंश सेल्सियस तापमान राहील.

6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा सर्वाधिक उष्णता जाणवेल. कमाल 36-40 अंश तर किमान 21-24 अंश सेल्सियस तापमान राहील.

7/7
एकंदरीत, 12 मार्चला महाराष्ट्रात उन्हाळ्याचा तीव्र चटका कायम राहील. नागरिकांनी भरपूर द्रवपदार्थ घ्या, सूर्यप्रकाश टाळा आणि उष्णतेच्या लक्षणांवर लक्ष ठेवा.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement