advertisement

IAS Transferred: तीन बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, CM फडणवीस यांचा निर्णय

Last Updated:

Maharashtra IAS Transfer: राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. तीन बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय बुधवारी रात्री जारी करण्यात आले.

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
तुषार रूपनवर, प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील तीन बड्या सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे. आयएएस विजय सूर्यवंशी, बापू पवार, महेश आव्हाड यांच्या बदल्यांचा आदेश बुधवारी रात्री जारी करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रत्येक आठ दहा दिवसाला पाच-सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. या बदल्यांची परंपरा या आठवड्यातही कायम आहे.

कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?  

१. विजय सूर्यवंशी (IAS 2006) विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे येथे महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
advertisement
२. बापू पवार (IAS 2015) सहसचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मुंबई यांची महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३. महेश आव्हाड (IAS 2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, पुणे येथे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
advertisement

गेल्याच आठवड्यात दोन ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची बदली

१. डॉ. सुहास दिवसे (IAS:SCS:२००९) कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांची यशदा, पुणे येथे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. शैलेश नवाल (IAS:RR:२०१०) केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत आलेले आणि सेटलमेंट कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS Transferred: तीन बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, CM फडणवीस यांचा निर्णय
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement