Monalisa Marriage: निकाह नाही तर लग्न; महाकुंभची 'व्हायरल सुंदरी मोनालीसाने, फरमानसोबत मंदिरात बांधली लग्नगाठ
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेक दिवसांच्या संघर्षांनंतर, अखेर आज इंदूरच्या मोनालिसा भोसलेने आपला प्रियकर फरमान खानसोबत लग्नसाठ बांधली आहे. कुटुंबाचा तीव्र विरोध, जीवाला असलेला धोका आणि आंतरधर्मीय विवाहाचा वाद अशा परिस्थितीत केरळच्या भूमीत हा विवाह सोहळा पार पडला.
advertisement
advertisement
बुधवारी सायंकाळी 05:30 वाजता तिरुवनंतपुरमच्या बाहेरील भागात असलेल्या ऐतिहासिक अरुमनूर नैनार मंदिरात हा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, एका मुस्लीम तरुणासोबत (फरमान खान) लग्न करताना मोनालिसाने हिंदू विधीनुसार लग्नाचे सर्व विधी पूर्ण केले. हे लग्न केवळ धार्मिक विधी नव्हता, तर तो दोन जीवांच्या संघर्षाचा विजय होता.
advertisement
मोनालिसाच्या वडिलांचा, जयसिंग भोसले यांचा या आंतरधर्मीय लग्नाला कडाडून विरोध होता. त्यांनी मोनालिसाचे लग्न दुसऱ्याशी लावण्याचा प्रयत्न केला, पण मोनालिसा आपल्या निर्णयावर ठाम होती. जेव्हा ती आपल्या 'नागम्मा' या मलयाळम चित्रपटाच्या शूटिंगसाठी केरळमध्ये आली, तेव्हा तिने संधी साधून थम्पनूर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
advertisement
पोलिसांनी ती 18 वर्षांची (प्रौढ) असल्याची खात्री केली आणि भारतीय कायद्यानुसार तिला जोडीदार निवडण्याचा अधिकार बहाल केला. या लग्नाला केरळमधील प्रमुख राजकीय नेते, शिक्षणमंत्री व्ही. शिवंकुट्टी, सीपीएम राज्य सचिव एम.व्ही. गोविंदन आणि खासदार ए.ए. रहीम यांनी या सोहळ्याला पाठिंबा दर्शवला, ज्यामुळे या जोडप्याला मोठे नैतिक बळ मिळाले.
advertisement
मोनालिसा मूळची इंदूरची असून फरमान महाराष्ट्राचा रहिवासी आहे. या दोघांची ओळख दीड वर्षांपूर्वी फेसबुकवर झाली होती. दरम्यानच्या काळात मोनालिसा कुंभमेळ्यात रुद्राक्ष आणि फुलांच्या माळा विकताना व्हायरल झाली. तिच्या सौंदर्यामुळे तिला दाक्षिणात्य सिनेसृष्टची दारं उघड झाली. आज ती 'नागम्मा' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे.
advertisement
सोशल मीडियावर या लग्नानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. काही लोक याला 'खऱ्या आयुष्यातील केरळ स्टोरी' म्हणत आहेत, जिथे राज्याने पुढाकार घेऊन दोन वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्तींना त्यांच्या पसंतीने जगण्याचे स्वातंत्र्य मिळवून दिले. कुटुंबाच्या विरोधात जाऊन राज्याच्या मदतीने पार पडलेले हे लग्न सध्या देशातील सर्वात 'ट्रेन्डिंग' विषय ठरले आहे.








