Thakkali Srinivasan Died: प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड, 72 व्या वर्षी अखेरचा श्वास; सिनेसृष्टीवर शोककळा
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
ज्येष्ठ तामिळ चित्रपट निर्माते आणि कलाकार थक्कली श्रीनिवासन यांचं निधन झालं आहे. ते 72 वर्षांचे होते.
मुंबई: टॉलिवूड इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ तामिळ चित्रपट निर्माते आणि कलाकार थक्कली श्रीनिवासन (Thakkali Srinivasan) यांचं निधन झालं आहे. ते 72 वर्षांचे होते. टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक ते होते. ते एक उत्तम कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि संगीतकार होते. थक्कली श्रीनिवासन गेल्या काही वर्षांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होते. गेल्या अनेक वर्षांपासूनची सुरू असलेली गंभीर आजाराशी झुंज आज अखेर अपयश ठरलेली आहे.
72 वर्षीय थक्कली श्रीनिवासन यांचं बंगळुरूमध्ये निधन झाल्याची माहिती निखिल मुरूकन यांनी दिली आहे. निखिल मुरूकन हे टॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधीत आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, निर्माते/ दिग्दर्शक/ संगीतकार आणि अभिनेता थक्कली श्रीनिवासन यांचे निधनाचे वृत्त सांगताना आम्हाला फार दु:ख होत आहे. थक्कली श्रीनिवासन यांचे वयाच्या 72 व्या वर्षी बंगळुरू येथे काही दुर्धर आजारामुळे निधन झाले. 11 मार्च रोजी बेंगळुरू येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. थक्कली यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये अभिनय, संगीत आणि दिग्दर्शनात आपली छाप सोडली आहे. तसेच त्यांनी अनेक चित्रपट प्रॉड्यूस देखील केले आहेत.
advertisement
Deeply regret to inform that Producer/Director/Composer Thakkali Srinivasan passed away due to health complications in Bengaluru. His last rites will be performed in Bengaluru tomorrow (March 11)
A successful producer who produced some landmark films like
Ivargal Varungala… pic.twitter.com/sxZrKWynY4
— Nikil Murukan (@onlynikil) March 10, 2026
advertisement
थक्काली श्रीनिवासन यांनी आपल्या कारकिर्दीत एक यशस्वी निर्माता म्हणून, इवरगल वरुणगला थूनगल, मनसुकल मथाप्पू, नालाई मनिथन, जेनमा नटचतिरम, विटनेस आणि अधियासाया मनिथन या चित्रपटांसाठी काम केलं आहे. निर्मितीपलीकडे दिग्दर्शनातही आणि संगीत क्षेत्रातही त्यांचे योगदान अतुलनीय होते. सुपरस्टार कमल हासनच्या 'सूरा सम्हारम' मध्ये खलनायकाची भूमिका साकारून त्यांनी अभिनेता म्हणूनही आपली ओळख निर्माण केली. ते एक सामाजिक कार्यकर्ते होते जे त्यांच्या आयुष्यात एक आश्रम चालवत होते आणि त्यांच्या दत्तक मुलांसोबत राहत होते. थक्काली श्रीनिवासन यांच्या निधनाचे वृत्त ऐकून चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे. थक्काली श्रीनिवासन यांच्या जाण्याने तामिळ सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 9:21 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Thakkali Srinivasan Died: प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड, 72 व्या वर्षी अखेरचा श्वास; सिनेसृष्टीवर शोककळा









