होणाऱ्या बायकोचे प्रायव्हेट Video काढले अन् मती फिरली, सासू-सासऱ्यांनी शिजवला हादरवणारा कट
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
होणाऱ्या पत्नीचा प्रायव्हेट व्हिडिओ बनवून तो सार्वजनिक करण्याची धमकी देत 1 कोटी रुपये हुंडा मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
होणाऱ्या पत्नीचा प्रायव्हेट व्हिडिओ बनवून तो सार्वजनिक करण्याची धमकी देत 1 कोटी रुपये हुंडा मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाच कुटुंबातील 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या वडिलांनी 19 डिसेंबरला याप्रकरणी तक्रार दाखल केली. आपल्या 22 वर्षांच्या मुलीचं लग्न प्रयागराजमधील जॉर्ज टाऊन परिसरातील रहिवासी उत्कर्ष अग्रवालसोबत ठरलं होतं, असं मुलीचे वडील म्हणाले.
तक्रारीनुसार, लग्न 25 लाख रुपयांना ठरले होते आणि साखरपुडा समारंभात मुलीच्या वडिलांनी 5 लाख रुपये रोख, सोन्याची अंगठी आणि 70,000 रुपये भेट म्हणून दिले. मुलीच्या वडिलांनी सांगितले की लग्नाची तारीख पुढील वर्षी 8 फेब्रुवारी रोजी निश्चित करण्यात आली होती. साखरपुड्यानंतर उत्कर्ष अग्रवालने मुलीसोबत मोबाईल फोनवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्यास सुरुवात केली.
advertisement
मुलीच्या वडिलांनी आरोप केला आहे की त्यांच्या उत्कर्ष तिला हळूहळू आमिष दाखवत होता आणि तिच्या काही खाजगी व्हिडिओ क्लिप्स बनवत होता आणि नंतर हे व्हिडिओ क्लिप्स सार्वजनिक करण्याची धमकी देत 1 कोटी रुपये हुंडा मागत होता. लग्न 25 लाख रुपयांमध्ये ठरले आहे मग 1 कोटी रुपयांची मागणी कुठून आली? असा प्रश्न मुलीच्या वडिलांनी विचारला तेव्हा तेव्हा उत्कर्ष अग्रवाल शिवीगाळ करू लागल्याचा दावाही मुलीच्या वडिलांनी केला आहे. तसंच उत्कर्षची बहीण नियती अग्रवालनेही व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा दावा मुलीच्या वडिलांनी केला आहे.
advertisement
जेव्हा मुलीचे वडील प्रयागराज येथे अग्रवाल कुटुंबाला त्यांच्या घरी भेटायला गेले तेव्हा उत्कर्ष अग्रवाल, त्याचे वडील शोभित अग्रवाल, आई शिप्रा आणि बहीण नियती यांनी त्यांना शिवीगाळ आणि अपमान केला आणि लग्नासाठी 1 कोटी रुपये न दिल्यास साखरपुडा मोडण्याची आणि मुलीची बदनामी करण्याची धमकी दिली.
पोलिस अधीक्षक (कौशाम्बी) राजेश कुमार यांनी मंगळवारी सांगितले की त्यांना तक्रार पत्र मिळाले आहे आणि त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी आरोपी उत्कर्ष, त्याचे वडील शोभित अग्रवाल, आई शिप्रा आणि बहीण नियती यांच्याविरुद्ध कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
view commentsLocation :
Kaushambi,Uttar Pradesh
First Published :
Dec 23, 2025 11:35 PM IST
मराठी बातम्या/देश/
होणाऱ्या बायकोचे प्रायव्हेट Video काढले अन् मती फिरली, सासू-सासऱ्यांनी शिजवला हादरवणारा कट










