advertisement

Sunidhi Chauhan: 18 व्या वर्षी 13 वर्ष मोठ्या मुस्लिम व्यक्तीशी लग्न, वर्षभरातच घटस्फोट; बॉलिवूड सिंगरसोबत घडलेलं भयानक

Last Updated:
Bollywood Controversy: बॉलिवूडमध्ये अशीच एक रॉकस्टार आहे, जिच्या आवाजाने संपूर्ण देश थिरकायला लागतो, पण तिच्या मनातील दुःख तिच्या चेहऱ्यावरील हास्यामुळे कधीच ओळखता येत नाही.
1/9
मनोरंजन विश्वातील आयुष्य वरून जितकं आकर्षक आणि झगमगाटाचं असतं, आतून ते तितकं एकटेपणा आणि काही रहस्यमयी गोष्टींनी भरलेलं असतं. या इंडस्ट्रीमधील कलाकारांच्या आयुष्यात असे काही पैलू असतात, जे त्यांच्या चाहत्यांनाही ठाऊक नसतात.

2/9
बॉलिवूडमध्ये अशीच एक रॉकस्टार आहे, जिच्या आवाजाने संपूर्ण देश थिरकायला लागतो, पण तिच्या मनातील दुःख तिच्या चेहऱ्यावरील हास्यामुळे कधीच ओळखता येत नाही. ही सुपरस्टार सिंगर आहे सुनिधी चौहान. गेली कित्येक वर्षे सुनिधीने तिच्या आवाजाने चाहत्यांना भुरळ पाडली आहे.

3/9
लोकप्रिय प्लेबॅक सिंगर सुनिधी चौहान आज देशातील टॉप गायिकांपैकी एक आहे. अवघ्या ५ व्या वर्षापासून गाण्याचे धडे गिरवणाऱ्या सुनिधीने वयाच्या १३ व्या वर्षी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आणि पाहता पाहता ती देशातील नंबर १ परफॉर्मर बनली. क्लासिकल म्युझिक असो किंवा मग मॉडर्न रॉक बँड, असं कोणतंही संगीत नाही, ज्यात सुनिधीने आपली छाप सोडली नाही.

4/9
मात्र, आज सर्वांसमोर नेहमी हसतमुख असलेल्या सुनिधीच्या वैयक्तिक आयुष्यात एक असं वादळ आलं होतं, ज्याने तिचं आयुष्य पूर्णपणे विस्कळीत केलं होतं. नुकतंच एका मुलाखतीत सुनिधीने तिच्या पहिल्या लग्नाबद्दल आणि त्यातून मिळालेल्या दुःखाबद्दल मोकळेपणाने सांगितलं आहे.

5/9
करिअरच्या टॉपवर असलेल्या सुनिधीने अवघ्या १८ व्या वर्षी आयुष्यातील सर्वात मोठा आणि तितकाच वादग्रस्त निर्णय घेतला. सुनिधीने तिच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठे असलेले मुस्लिम कोरिओग्राफर बॉबी खान यांच्याशी लग्न केलं. मात्र, तिचे वडील सुनिधीच्या या निर्णयाच्या विरोधात होते.

6/9
प्रेमात आकंठ बुडालेल्या सुनिधीने त्यावेळी आपल्या कुटुंबाचा कोणताही विचार न करता बॉबी खान यांच्याशी निकाह केला. मात्र, या निर्णयाचा सुनिधीच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. या लग्नामुळे तिच्या वैयक्तिक जीवनात उलथापालथ झालीच, पण तिच्या करिअरवरही त्याचं सावट दिसू लागलं.

7/9
दुर्दैवाने ज्या प्रेमासाठी सुनिधीने तिचं घर सोडलं होतं, ते नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर काही महिन्यांतच दोघांमध्ये खटके उडू लागले आणि अवघ्या एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.

8/9
पहिल्या लग्नाच्या आठवणी सांगताना सुनिधी म्हणाली,
पहिल्या लग्नाच्या आठवणी सांगताना सुनिधी म्हणाली, "मी माझ्या आयुष्यात अनेक चुका केल्या आहेत, पण बॉबी खानशी केलेलं ते लग्न ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. सुदैवाने मला वेळेतच जाणीव झाली की मी चुकीच्या ठिकाणी अडकले आहे. देवाचे आभार की मला तिथून बाहेर पडण्याची बुद्धी मिळाली."
advertisement
9/9
आजच्या घडीला सुनिधी तिच्या पहिल्या लग्नाला एक धडा म्हणू पाहते. तिच्या मते, तिच्या एका चुकीच्या निर्णयाने तिला आयुष्याची कडवट बाजू खूप लवकर दाखवली. त्यामुळेच आज ती एक खंबीर आणि चांगली व्यक्ती बनू शकली आहे. पण आता ती खूप पुढे निघून आली आहे. घटस्फोटानंतर सुनिधी पूर्णपणे कोलमडून गेली होती, पण तिने पुन्हा एकदा संगीताचा आधार घेतला. मेहनतीच्या जोरावर तिने इंडस्ट्रीतील आपला दबदबा कायम ठेवला आहे.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement