advertisement

Pregnancy Planning : प्रेग्नंसी प्लॅन करण्याआधी डेंटिस्टकडे जाणं गरजेचं, पण का? कारण ऐकून तुम्हीही चकित व्हाल

Last Updated:
कदाचित तुम्हाला ऐकून नवल वाटेल, पण आई होण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांइतकेच डेंटिस्टला भेटणेही महत्त्वाचे असते. आता तुम्ही म्हणाल की दातांचा आणि प्रेग्नंसीचा काय संबंध?, डेंटिस्ट यामध्ये काय करणार? तर त्यामागे एक गंभीर वैज्ञानिक कारण दडलेले आहे.
1/7
घरात छोटा पाहुणा येणार म्हटलं की आनंदाला पारावार उरत नाही. मग सुरू होते तयारी. डाएटमध्ये बदल, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, योगासने आणि डॉक्टरांचे सल्ले. पण, फॅमिली प्लॅनिंग करताना आपण अनेकदा अशा एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, ज्याचा थेट संबंध येणाऱ्या बाळाच्या आरोग्याशी असू शकतो. ती गोष्ट म्हणजे तुमचे दातांचे आरोग्य.

2/7
कदाचित तुम्हाला ऐकून नवल वाटेल, पण आई होण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांइतकेच डेंटिस्टला भेटणेही महत्त्वाचे असते. आता तुम्ही म्हणाल की दातांचा आणि प्रेग्नंसीचा काय संबंध?, डेंटिस्ट यामध्ये काय करणार? तर त्यामागे एक गंभीर वैज्ञानिक कारण दडलेले आहे.
कदाचित तुम्हाला ऐकून नवल वाटेल, पण आई होण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांइतकेच डेंटिस्टला भेटणेही महत्त्वाचे असते. आता तुम्ही म्हणाल की दातांचा आणि प्रेग्नंसीचा काय संबंध?, डेंटिस्ट यामध्ये काय करणार? तर त्यामागे एक गंभीर वैज्ञानिक कारण दडलेले आहे.
advertisement
3/7
नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की,
नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, "जर तुम्ही प्रेग्नंसी प्लॅन करत असाल, तर किमान एक वर्ष आधीपासून तयारी सुरू करा आणि त्याची सुरुवात डेंटिस्टला भेटून करा. यामुळे तुमची प्रेग्नंसी किती सुखकर होईल, याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही." एनडीटीव्हीच्या एका अहवालानुसार, अनेक तज्ज्ञांनी या दाव्याला दुजोरा दिला आहे. आकाश हेल्थकेअरच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. भूमिका मदान यांच्या मते, शरीराचे आरोग्य आणि तोंडाचे आरोग्य एकमेकांशी खोलवर जोडलेले असते.
advertisement
4/7
दातांच्या समस्यांचा बाळावर कसा होतो परिणाम?गर्भाधान होण्यापूर्वी आणि गर्भधारणेदरम्यान शरीरात मोठे हार्मोनल बदल होत असतात. यामुळे खालील समस्या उद्भवू शकतात:
1. संवेदनशील हिरड्या: हार्मोन्समुळे हिरड्यांमध्ये सूज येणे, रक्त येणे किंवा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
2. रक्तदाबावर परिणाम: तोंडाची स्वच्छता नीट नसेल, तर हिरड्यांचे आजार वाढतात, ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान 'हाय ब्लड 3. प्रेशर'चा (High BP) त्रास होऊ शकतो.
4. बाळाला धोका: सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तोंडातील संसर्ग किंवा बॅक्टेरिया रक्ताद्वारे शरीरात पसरू शकतात. यामुळे प्री-टर्म बर्थ किंवा जन्मावेळी बाळाचे वजन कमी भरण्याचा धोका असतो.
दातांच्या समस्यांचा बाळावर कसा होतो परिणाम?गर्भाधान होण्यापूर्वी आणि गर्भधारणेदरम्यान शरीरात मोठे हार्मोनल बदल होत असतात. यामुळे खालील समस्या उद्भवू शकतात:1. संवेदनशील हिरड्या: हार्मोन्समुळे हिरड्यांमध्ये सूज येणे, रक्त येणे किंवा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.2. रक्तदाबावर परिणाम: तोंडाची स्वच्छता नीट नसेल, तर हिरड्यांचे आजार वाढतात, ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान 'हाय ब्लड 3. प्रेशर'चा (High BP) त्रास होऊ शकतो.4. बाळाला धोका: सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तोंडातील संसर्ग किंवा बॅक्टेरिया रक्ताद्वारे शरीरात पसरू शकतात. यामुळे प्री-टर्म बर्थ किंवा जन्मावेळी बाळाचे वजन कमी भरण्याचा धोका असतो.
advertisement
5/7
तज्ज्ञ काय म्हणतात?आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. अर्चना धवन बजाज सांगतात की,
तज्ज्ञ काय म्हणतात?आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. अर्चना धवन बजाज सांगतात की, "ज्याप्रमाणे आपण आहार आणि जीवनशैली बदलतो, त्याचप्रमाणे 'ओरल हायजीन' देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जर हिरड्यांमधील बॅक्टेरिया रक्तप्रवाहात मिसळले, तर त्याचा गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो." म्हणूनच, आई होण्यापूर्वी दातांचे एक्स-रे, स्केलिंग किंवा इतर किरकोळ शस्त्रक्रिया करून घेणे फायद्याचे ठरते, कारण गर्भधारणेनंतर अनेक औषधे आणि उपचारांवर मर्यादा येतात.
advertisement
6/7
निरोगी सुरुवातीसाठी 'हे' नक्की करा1. वेळेवर तपासणी: गर्भधारणेच्या किमान 6 महिने ते 1 वर्ष आधी डेंटिस्टकडून संपूर्ण चेकअप करून घ्या.
2. दातांची स्वच्छता: दात किडणे किंवा हिरड्यांचे आजार असल्यास ते आधीच बरे करा.
3. कॅल्शियमवर लक्ष द्या: आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा, जेणेकरून तुमचे दात आणि बाळाची हाडे मजबूत राहतील.
निरोगी सुरुवातीसाठी 'हे' नक्की करा1. वेळेवर तपासणी: गर्भधारणेच्या किमान 6 महिने ते 1 वर्ष आधी डेंटिस्टकडून संपूर्ण चेकअप करून घ्या.2. दातांची स्वच्छता: दात किडणे किंवा हिरड्यांचे आजार असल्यास ते आधीच बरे करा.3. कॅल्शियमवर लक्ष द्या: आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा, जेणेकरून तुमचे दात आणि बाळाची हाडे मजबूत राहतील.
advertisement
7/7
बाळासाठी पाळणा सजवण्यासोबतच आईने स्वतःच्या हसण्याकडे आणि दातांकडे लक्ष देणे, ही खऱ्या अर्थाने निरोगी आणि सुरक्षित सुरुवात आहे. त्यामुळे जर तुम्ही प्रेग्नंसीचा विचार करत असाल, तर आजच तुमच्या डेंटिस्टची अपॉइंटमेंट निश्चित करा

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement