Alcohol Fact : बिअर, व्हिस्की आणि रम? पार्टीत ड्रिंक्स बदलायची असेल तर 'हा' सिक्वेन्स पाळा; दुसऱ्या दिवशी होणार नाही Hangover
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकांना कोणतं ड्रिंक कशावर पितात आणि कशावर पित नाहीत हे माहित नसतं, त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याचे गंभीर परिणाम पाहायला मिळतात.
येत्या 31 डिसेंबरच्या रात्री अनेक घरांमध्ये आणि हॉटेल्समध्ये पार्ट्यांचा माहोल असेल. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना मित्र-मैत्रिणींसोबत ड्रिंक्स घेणं ही आता एक फॅशन झाली आहे. पण अनेकदा होतं काय, पार्टी रंगात येते आणि आणलेली दारू कमी पडते, त्यात रात्रीच्या वेळी दुकानं तर बंद असतात, मग घरात जे उपलब्ध आहे म्हणजे बिअरवर व्हिस्की किंवा व्हिस्कीवर रम, असं कोणतंही ड्रिंक पुढे कन्टिन्यू केलं जातं.
advertisement
पण अनेकांना कोणतं ड्रिंक कशावर पितात आणि कशावर पित नाहीत हे माहित नसतं, त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याचे गंभीर परिणाम पाहायला मिळतात. दुसऱ्या दिवशी सकाळी भयंकर हँगओव्हर, उलट्या आणि डोकेदुखीने जीव नकोसा होतो. म्हणूनच, 'कशावर काय प्यायलं' तर त्रास कमी होतो, याचं एक विज्ञान आहे. न्यू इअर पार्टी करण्यापूर्वी हे नियम एकदा नक्की वाचून घ्या.
advertisement
बिअरवर व्हिस्की की व्हिस्कीवर बिअर? काय आहे आरोग्यदायी 'सिक्वेन्स'?जगभरात मद्यप्रेमींमध्ये एक जुनी म्हण प्रसिद्ध आहे "Beer before liquor, never been sicker; liquor before beer, you’re in the clear." याचा सोपा अर्थ असा की, जर तुम्ही आधी बिअर प्यायली आणि नंतर व्हिस्की किंवा रमसारख्या कडक दारूकडे वळलात, तर तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता जास्त असते. पण जर तुम्ही आधी कडक ड्रिंक (व्हिस्की/रम) घेतलं आणि नंतर बिअर घेतली, तर त्रास कमी होतो.
advertisement
हे असं का होतं?बिअरमध्ये कार्बन डायऑक्साइड असतो. जर तुम्ही आधी बिअर प्यायली आणि नंतर व्हिस्की घेतली, तर बिअरमधील गॅसमुळे तुमच्या शरीरातील अल्कोहोल शोषून घेण्याचा वेग वाढतो. यामुळे तुम्हाला खूप लवकर आणि जास्त चढते, ज्यामुळे उलट्या होण्याचा धोका वाढतो. बिअरमध्ये अल्कोहोल कमी असतं, तर व्हिस्की/रममध्ये ते जास्त असतं. आधी हलकं ड्रिंक घेऊन अचानक जड ड्रिंक घेतल्यावर शरीराला तो बदल पचवणं कठीण जातं.
advertisement
advertisement
रंग पाळा: शक्यतो 'लाईट' रंगाच्या दारूवरून (उदा. व्होडका किंवा जिन) 'डार्क' रंगाच्या दारूकडे (व्हिस्की किंवा रम) वळू नका. यामुळे हँगओव्हर जास्त होतो.गडद रंगाच्या दारूमध्ये 'कन्जेनर्स' नावाचे घटक जास्त असतात, जे हँगओव्हरला आमंत्रण देतात. त्यामुळे दोन डार्क ड्रिंक्स मिक्स करणं म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या डोकेदुखीला स्वतःहून बोलावणं आहे.
advertisement
पार्टी एन्जॉय करताना 'या' चुका टाळा1. रिकाम्या पोटी पिणे ही सर्वात मोठी चूक. दारू पिण्यापूर्वी काहीतरी पौष्टिक खा. यामुळे अल्कोहोल रक्तात मिसळण्याचा वेग मंदावतो.2. दारू शरीराला डिहायड्रेट (पाणी कमी करणे) करते. प्रत्येक पेगनंतर किंवा मध्ये मध्ये पाणी पीत राहा. याला 'वन-टू-वन' नियम म्हणतात.3. दारूमध्ये कोल्ड्रिंक्स किंवा जास्त साखर असलेले ज्यूस मिसळू नका. साखरेमुळे हँगओव्हर दुप्पट तीव्र होतो.
advertisement
advertisement
advertisement









