Dhurandhar ची हवा डोक्यात गेली? फरहान अख्तरच्या Don 3 मधून रणवीर सिंहची एक्झिट! कारण शॉकिंग

Last Updated:
Ranveer Singh's exit from Don 3: ज्या Don 3 साठी चाहते गेल्या कित्येक महिन्यांपासून डोळे लावून बसले होते, त्या चित्रपटातून रणवीरने चक्क एक्झिट घेतली आहे. आता 'डॉन ३' मध्ये रणवीर सिंग दिसणार नाहीये. पण त्याने हा निर्णय का घेतला?
1/9
मुंबई: सध्या बॉलीवूडमध्ये फक्त एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे रणवीर सिंग! त्याच्या 'धुरंधर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर असा काही धुमाकूळ घातलाय की, मोठ्या मोठ्या सुपरस्टार्सना घाम फुटला आहे. पण या यशाच्या शिखरावर असतानाच रणवीरने एक असा निर्णय घेतलाय, ज्याने सिनेसृष्टीत खळबळ माजली आहे.

advertisement
2/9
ज्या Don 3 साठी चाहते गेल्या कित्येक महिन्यांपासून डोळे लावून बसले होते, त्या चित्रपटातून रणवीरने चक्क एक्झिट घेतली आहे. आता 'डॉन ३' मध्ये रणवीर सिंग दिसणार नाहीये. पण त्याने हा निर्णय का घेतला? काय आहे यामागचं कारण? जाणून घेऊया.

3/9
मिळालेल्या माहितीनुसार, 'धुरंधर'मध्ये रणवीरने ज्या पद्धतीने गुन्हेगारी विश्वाचा थरार मांडला, त्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. पण रणवीरला आता स्वतःला एकाच साच्यात अडकवायचं नाहीये.

4/9
'डॉन' ही सुद्धा गँगस्टरचीच भूमिका आहे आणि एकापाठोपाठ एक अशा नकारात्मक भूमिका केल्यामुळे आपली प्रतिमा टाईपकास्ट होईल, अशी भीती रणवीरला वाटतेय. त्याला आता काहीतरी वेगळं, आव्हानात्मक आणि प्रेक्षकांना थक्क करणारं करायचं आहे.

5/9
रणवीरने आता आपलं लक्ष संजय लीला भन्साळी, दाक्षिणात्य दिग्दर्शक लोकेश कनागराज आणि अ‍ॅटली यांसारख्या दिग्गजांच्या चित्रपटांकडे वळवलं आहे. त्याला आता एका साच्यातील अभिनेता बनून राहायचं नसून, अभिनयाचे नवनवे पैलू शोधायचे आहेत.

6/9
'डॉन ३' सोडल्यानंतर रणवीरने निर्माता जय मेहता यांच्या 'प्रलय' या सिनेमाला पसंती दिली आहे. हा सिनेमा म्हणजे केवळ मारधाड नसून, हा एक झॉम्बीवर आधारित चित्रपट आहे. एका कठीण परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून एक माणूस आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी किती थराला जाऊ शकतो, अशी ही इमोशनल आणि थ्रिलर कथा आहे.

7/9
विशेष म्हणजे, रणवीरने स्वतः पुढाकार घेऊन या सिनेमाच्या तारखा जुळवायला सुरुवात केली आहे, जेणेकरून याचं काम वेगाने सुरू होईल.

8/9
फरहान अख्तरच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला सध्या ग्रहण लागल्यासारखं वाटतंय. याआधी मुख्य अभिनेत्री कियारा अडवाणीने गरोदरपणामुळे सिनेमा सोडला, तिच्या जागी आता क्रिती सेननची एन्ट्री झाली आहे. त्यानंतर व्हिलनच्या भूमिकेसाठी असलेला विक्रांत मॅसी याला स्क्रिप्ट आवडली नाही, म्हणून तोही बाहेर पडला आणि आता चक्क मुख्य हिरोनेच पाठ फिरवल्यामुळे निर्मात्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

9/9
निर्माते मात्र जानेवारी २०२६ मध्येच शूटिंग सुरू करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता बॉलिवूडमध्ये एका नव्या डॉनचा शोध सुरू झाला आहे. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यानंतर आता तिसरा डॉन म्हणून कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Navi Mumbai News:  रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?
रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं
  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

View All
advertisement