सोशल मीडिया स्टार प्राजक्ता कोळी पहिल्यांदाच मराठी सिनेमात! या दिग्गज कलाकारांसोबत करणार धमाका
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Prajakta Koli Debut in Marathi Film : डिजिटल जगतात मोठं नाव कमावल्यानंतर त्याचबरोबर काही बॉलिवूड चित्रपटांत काम केल्यानंतर प्राजक्ता कोळी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात झळकणार आहे.
मुंबई : सोशल मीडियावरील प्रसिद्ध युट्यूबर आणि इन्फ्लुएंसर प्राजक्ता कोळी. MostlySane या नावाने तिने 2015 मध्ये यूट्यूबवर सुरुवात केली. दैनंदिन जीवनावर आधारित विनोदी व्हिडिओंमुळे ती लवकरच प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिने अभिनयाकडे वळत नेटफ्लिक्सच्या मिसमॅच या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका केली. बॉलिवूडमध्ये तिने 'जुग जुग जियो' या चित्रपटातून पदार्पण केले. डिजिटल जगतात मोठं नाव कमावल्यानंतर आता ती पहिल्यांदाच मराठी चित्रपटात झळकणार आहे.
काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी त्यांच्या आगामी चित्रपट 'क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम' ची घोषणा केली होती. मराठी शाळांची कमी होत जाणारी संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व यावर मनोरंजन करत भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण अलिबाग आणि आसपासच्या भागात यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतरच यात कलाकार कोण असतील, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पूर्णविराम देत चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
advertisement
यात कलाकारांचे चेहरे जरी दिसत नसले तरी चित्रपटात दमदार कलाकारांची भक्कम फौज पाहायला मिळणार हे नक्की. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, तरुण पिढीचे स्टार्स अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर, लोकप्रिय अभिनेत्री क्षिती जोग, कादंबरी कदम, तसेच हरीश दुधाडे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्यासह सोशल मिडीया स्टार प्राजक्ता कोळी प्रथमच मराठी चित्रपटात दिसणार आहे. या सर्व ताकदीच्या कलाकारांचा अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणे, म्हणजे प्रेक्षकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
advertisement

क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. लवकरच या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 11:41 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
सोशल मीडिया स्टार प्राजक्ता कोळी पहिल्यांदाच मराठी सिनेमात! या दिग्गज कलाकारांसोबत करणार धमाका