आभाळ फाटलं, गावं-मंदिरं, रस्ते पाण्याखाली, पुढचे 48 तास कशी राहिली परिस्थिती? हवामान विभागाने दिली नवीन अपडेट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई, ठाणे, बारामती, नागपूर, लोणावळा, पनवेल, बीडसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण केली असून पुढील 48 तास हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबई: आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडतो आहे. मध्यरात्रीपासून मुंबई, ठाणे, उपनगरपासून संपूर्ण महाराष्ट्रात कहर व्हावा असा पाऊस कोसळत आहे. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती आहे पुढचे 48 तास हवामान कसं राहील याबाबत हवामान विभागाने महत्त्वाची अपडेट दिली आहे.
बारामती शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाने रुई गावात विद्या प्रतिष्ठानच्या बाजूला असणाऱ्या ओढ्याला पूर आलाय.. पुलावरून पाणी वाहत आहे. इंदापूर तालुक्यातील सणसर गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांसह नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं. ओढ्याला पूर आल्यानं पुलावरूनही पाणी वाहत आहे. शिरूर तालुक्यात पावसानं थैमान घातलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक पिकं पाण्याखाली गेलीत. शेतात पाणी साचल्यानं कांदा पीक उद्ध्वस्त होण्याची भीतीही निर्माण झाली आहे.
advertisement
नागपुरात देखील रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना नाल्यांना पूर आला असून नायगाव- प्रयागधाम रोडवरील पूल पाण्याखाली गेलाय त्यामुळे वाहतूक ठप्प झालीय तसेच आजूबाजूला असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी गेले आहे दरम्यान गॅरेज मध्ये लावलेली वाहने देखील पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे त्यामुळे मोठे नुकसान नायगाव परिसरात झालेले आहे
मावळात पावसाचं जोरदार पुनरागमन झालं आणि निसर्गानं पुन्हा एकदा जादू केली आहे. जुना पुणे-मुंबई महामार्गावर, लोणावळा, खंडाळा घाटमाथा धुक्यात हरवून गेला आहे. लोणावळा आणि खंडाळ्याच्या पठारावर पावसाचा जोर वाढला असून, त्यातच जुना पुणे मुंबई परिसरात पसरलेलं शुभ्र धुकं आहे, त्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे.
advertisement
मुंबईसह उपनगर, नवी मुंबई, पनवेल, ठाण्यातही सखल भागांत पाणी साचायला सुरुवात झाली आहे. माटुंगा, दादरचा सखल भाग, अंधेरी सबवे या भागात पाणी साचायला लागलं आहे. पनवेलमध्ये कुंभारवाडा इथे पाणी भरलं आहे.
बीडच्या आष्टी शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, यामुळे रस्तांवर पाणी आलं. तालुक्यातील पाटसरा गावातील शेत तलाव फुटल्याने पाच ते सात एकर जमीन वाहून गेली आहे. दोन विहिरी चार बोरवेल आणि काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाला आहे. तात्काळ पंचनामे करून मुस्कान भर पहिले अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कडा परिसरातील सहा गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. पूर परिस्थिती एनडीआरएफ आणि भारतीय सैन्य मदतीसाठी बोलवलं आहे. कडा शहर पूर्णपणे खाली गेलं आहे अनेक घरात पाणी शिरलं आहे.
advertisement
महाराष्ट्रात पुढील 48 तास अति मुसळधार ते मुसळधार पाऊस असे अशी माहिती हवामान विभागाने दिली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्त पाऊस राहणार आहे. ही परिस्थिती निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र दोन दिवसांपासून तयार झालं आहे. त्याची मूव्हमेंट ही पश्चिम दिशेनं आहे. त्यामुळे मान्सूनचे वारे सुद्धा सक्रिय झाले होते. त्याच बरोबर विदर्भ आणि त्याचा आसपासच्या प्रदेशात हे विरलं गेलं असलं तरीसुद्धा त्याचा परिणाम वातावरणावर झाला आहे. त्यामुळे बहुतांश भागात जोरदार पाऊस पडताना दिसत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 12:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आभाळ फाटलं, गावं-मंदिरं, रस्ते पाण्याखाली, पुढचे 48 तास कशी राहिली परिस्थिती? हवामान विभागाने दिली नवीन अपडेट