Sangli Crime : 16 लाखांची रोकड, 2 कोटींचे सोन्याचे दागिने; सांगलीत 'स्पेशल 26' स्टाईल छापा, डॉक्टरला संशय आला अन्....
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sangli Fake IT Raid Crime : स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी सांगत चार व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी डॉक्टर म्हेत्रे यांना 'सर्च वॉरंट' दाखवले आणि घराची झडती घ्यायला सुरुवात केली.
Sangli Crime News : ज्याप्रमाणे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'स्पेशल 26' सिनेमात बनावट आयकर अधिकारी बनून लुट केली जाते, त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका प्रसिद्ध डॉक्टरच्या घरात बनावट आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
'सर्च वॉरंट' दाखवलं आणि घराची झडती घेतली
कवठेमहांकाळ शहरातील प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी सांगत चार व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी डॉक्टर म्हेत्रे यांना 'सर्च वॉरंट' दाखवले आणि घराची झडती घ्यायला सुरुवात केली. आम्ही तुमच्या घराती झडती घ्यायला आलोय, असं म्हणत संपूर्ण घर तपासायला सुरूवात केली.
advertisement
1 किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त
सिनेमात दाखवल्याप्रमाणे या बनावट अधिकाऱ्यांनी अत्यंत सफाईने आपले काम केले. त्यांनी घरातून सुमारे 16 लाख रुपयांची रोकड आणि जवळपास 1 किलो वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 2 कोटी रुपयांचा ऐवज जप्त केल्याचे सांगितले. त्यानंतर तेथून पोबारा केला. मात्र, कारवाई सुरू असताना डॉक्टरांना संशय येत होता.
advertisement
डॉक्टर म्हेत्रे यांना संशय आला
आरोपींनी पोबारा केल्यानंतर डॉक्टर म्हेत्रे यांना संशय आला आणि त्यांनी तातडीने कवठेमहांकाळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा छापा पूर्णपणे बनावट होता. त्यानंतर डॉक्टरांनी डोक्यालाच हात लावला. या तोतया आयकर अधिकाऱ्यांच्या धाडीमुळे सांगली जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
September 15, 2025 12:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli Crime : 16 लाखांची रोकड, 2 कोटींचे सोन्याचे दागिने; सांगलीत 'स्पेशल 26' स्टाईल छापा, डॉक्टरला संशय आला अन्....