Rain Update: छ. संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोड अन् पैठणला अतिवृष्टीचा तडाखा; शेतकरी हवालदिल, Photo
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Rain Update: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. 15 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला. नद्या-नाल्यांना पूर आला असून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
advertisement
सोमवारी पहाटे 3 ते 6 या वेळेत सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रासह धारला, चारणेर, पेंडगाव, आमठाणा, केळगाव, घावडा परिसरात 70 मिमी पाऊस पडला. ढगफुटीसदृश्य पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले. पुलांवरून पाणी वाहिल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतांमध्ये पाणी शिरल्याने मका, कपाशी, सोयाबीन, मका, अद्रक या पिकांचं नुकसान झालं.
advertisement
सकाळी 6 वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला. गावातील रस्ते जलमय झाले. चारनेर गावाला पाण्याने वेढा दिला होता. घटनांद्रा-सिल्लोड रस्ता सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद होता. गेल्या 20 वर्षांत असा पाऊस ग्रामस्थांनी पाहिला नसल्याचं सांगितलं. चारणा नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. नव्याने बांधलेल्या घाटनांद्रा-शेलगाव पुलावरूनही पाणी गेले. चारनेर लघु प्रकल्प तलाव शंभर टक्के भरला.
advertisement
advertisement
पैठण तालुक्यातील दहा महसुली मंडळांतील सुमारे 84 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महूसल प्रशासने वर्तवला आहे. रविवारी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच पंचनामे सुरू केले. तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचानामे सुरूच असल्याची माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली.
advertisement
advertisement
पैठण तालुक्यात पाचोड, आडूळ, कडेठणसह विहामांडवा परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे हर्षेबुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून खरीप हंगामातील तूर, उडीद, सोयाबीन, ऊस, कापूस आणि कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नागरिकांच्या घरात तसेच रस्त्यावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.
advertisement
advertisement
पैठण येथील शेतकरी अंबादास फुके यांनी 1 एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. जवळपास दहा ते अकरा टन तो कांदा निघाला असता. मुसळधार पावसामुळे पाण्यासोबतच कांदा वाहून गेला आहे. फुके यांना या कांदा शेतीसाठी 40 ते 50 हजार रुपयांचा खर्च लागला होता. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
advertisement







