advertisement

आमदार अर्जुन खोतकरांसमोर तुंबळ हाणामारी, 2 गटांनी एकमेकांना धू धू धुतलं, VIDEO व्हायरल

Last Updated:

आमदार अर्जुन खोतकर यांच्यासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. बस स्थानक परिसरात ही घटना घडल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

News18
News18
रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना: जालना शहरात सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदार अर्जुन खोतकर यांच्यासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. बस स्थानक परिसरात ही घटना घडल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हाणामारीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पोलीस त्याचा तपास करत आहेत.
सोमवारी रात्री जालन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बस स्थानक परिसरातील काही दुकाने आणि फर्निचरचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर आज सकाळी घटनास्थळी पोहोचले होते. ते पाहणी करत असतानाच, दोन फर्निचर विक्रेत्यांच्या गटांमध्ये अचानक वाद सुरू झाला आणि काही वेळातच त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गट एकमेकांना जोरदार मारहाण करत होते. ही घटना खोतकरांसमोरच घडल्याने एकच गोंधळ उडाला.
advertisement
दरम्यान, आमदार खोतकर यांनी स्वतः मध्यस्थी करत दोन्ही गटातील लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समजूत काढून हा वाद तत्काळ मिटवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या हाणामारीमुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती आणि वाहतूक कोंडी देखील झाली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच, सदर बाजार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थिती पूर्ववत केली. सध्या पोलीस या दोन्ही गटांमधील वादाचे नेमके कारण शोधत आहेत. पण आमदार खोतकर यांच्यासमोरच हाणामारी झाल्याने हे प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आमदार अर्जुन खोतकरांसमोर तुंबळ हाणामारी, 2 गटांनी एकमेकांना धू धू धुतलं, VIDEO व्हायरल
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement