Mumbai News: मुंबई आता नाही तुंबई, पाण्याखाली जाणाऱ्या सबवे वर उड्डाणपूल उभारणार; कसा- कुठे?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
प्रत्येक पावसाळ्यामध्ये पाण्याखाली जाणाऱ्या अंधेरी सबवेववर एक नवा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्यामुळे आता सबवेखाली पाणीभरण्याची मुंबईकरांची कायमची डोकेदुखी निघून जाणार आहे.
प्रत्येक पावसाळ्यामध्ये पाण्याखाली जाणाऱ्या अंधेरी सबवेववर एक नवा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये कंबरेपर्यंत पाण्यातून नागरिकांना, दुचाकीस्वारांना आणि ट्रॅफिक हवलदारांना रस्ता काढत पुढे जावं लागतं. दरवर्षीची ही डोकेदुखी आता लवकरच कायमची मिटणार आहे. मुंबई महानगर पालिकेने अलीकडेच अंधेरी सबवेवर पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तिथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचा सुरळित प्रवास होणार आहे.
कशापद्धतीने पूलाची उभारणी केली जाणार? मार्ग कसा असेल? याची चाचपणी केली जाणार आहे. नुकतंच महानगर पालिकेकडून सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्याकडून पुढच्या तीन महिन्यांमध्ये पूलाबद्दलचा अहवाल तयार होईल. अहवाल तयार झाल्यानंतर पुढच्या प्रक्रियेला महानगर पालिकेकडून सुरुवात होणार आहे. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या आणि उपनगराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या अंधेरी सबवेमध्ये मुसळधार पावसात वारंवार पाणी साचते.
advertisement
अंधेरी सबवेच्या शेजारूनच मोगरा नाला वाहतो, काही अंतरावरच हा नाला असल्यामुळे आणि सबवेचा संपूर्ण परिसर खोलगट असल्यामुळे तिथे पाणी भरण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि भरती आल्यानंतर नाल्यातलं पाणी बाहेर सबवे जवळ येतं, त्यामुळे मुंबईकरांना आपला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. मोठ्याप्रमाणावर पाऊस पडत असताना किंवा पाण्याची पातळी वाढत असली की, अंधेरी सबवेच्या इथली वाहतूक पूर्णपणे बंद होते.
advertisement
अंधेरीमधील अनेक भागांमध्ये खोलगट भाग असल्यामुळे तिथे लगेचच पाणी भरतं. त्यामुळे प्रशासनाकडून लगेचच वाहतूक वळवली जाते. सबवेम दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी, बीएमसीच्या पूल विभागाने विद्यमान सबवेच्या वर उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव सध्या वॉर्ड-नियोजन टप्प्यावर आहे, परंतु नागरी अधिकाऱ्यांनी प्रथम तपशीलवार व्यवहार्यता अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 4:41 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: मुंबई आता नाही तुंबई, पाण्याखाली जाणाऱ्या सबवे वर उड्डाणपूल उभारणार; कसा- कुठे?






