advertisement

Weekly Horoscope: धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीफळ; पैसा, डबल खुशखबर मिळणार, पण..

Last Updated:
Weekly Horoscope: फेब्रुवारीचा तिसरा आठवडा सुरू होत आहे. नवीन आठवड्याकडून सगळ्यांनाच काही चांगलं होण्याची अपेक्षा असते. ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा खूप खास मानला जातो, या आठवड्यात शुक्र, बुध, राहू, सूर्य आणि चंद्र कुंभ राशीत असतील. यासोबतच या आठवड्यात वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. या आठवड्यात अनेकांच्या आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. धनु, मकर, कुंभ, मीन राशींवरील साप्ताहिक परिणाम जाणून घेऊ.
1/6
धनु (Sagittarius) - धनु राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असेल. एखाद्या कामासाठी लांबचा किंवा जवळचा प्रवास करावा लागू शकतो, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या शुभ कार्यात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. मुलांच्या बाबतीतली एखादी मोठी चिंता दूर होईल. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. वडिलोपार्जित संपत्तीचे अडथळे दूर होऊन जमिनीचे व्यवहार सुरळीत होतील. पत्रकारिता, लेखन किंवा संवाद क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा खूप प्रगतीचा आहे. समाजात तुमचा मान वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात नवीन ओळखी होतील आणि मोठ्या लोकांशी संबंध येतील, ज्याचा फायदा भविष्यातील प्रोजेक्ट्ससाठी होईल. देवाधर्मात श्रद्धा वाढेल आणि तीर्थयात्रेचे योग येतील. जोडीदाराकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते. वैवाहिक आयुष्यात आनंदाची बातमी मिळेल.भाग्यशाली रंग: तपकरी
भाग्यशाली अंक: 7
धनु (Sagittarius) - धनु राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असेल. एखाद्या कामासाठी लांबचा किंवा जवळचा प्रवास करावा लागू शकतो, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या शुभ कार्यात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. मुलांच्या बाबतीतली एखादी मोठी चिंता दूर होईल. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. वडिलोपार्जित संपत्तीचे अडथळे दूर होऊन जमिनीचे व्यवहार सुरळीत होतील. पत्रकारिता, लेखन किंवा संवाद क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा खूप प्रगतीचा आहे. समाजात तुमचा मान वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात नवीन ओळखी होतील आणि मोठ्या लोकांशी संबंध येतील, ज्याचा फायदा भविष्यातील प्रोजेक्ट्ससाठी होईल. देवाधर्मात श्रद्धा वाढेल आणि तीर्थयात्रेचे योग येतील. जोडीदाराकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते. वैवाहिक आयुष्यात आनंदाची बातमी मिळेल.भाग्यशाली रंग: तपकरीभाग्यशाली अंक: 7
advertisement
2/6
मकर (Capricorn) - मकर राशीच्या लोकांनी या आठवड्यात स्वतःला वादापासून लांब ठेवणंच शहाणपणाचं ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा बोजा वाढल्यामुळे तुम्हाला खूप जास्त कष्ट घ्यावे लागतील. कामाच्या टेन्शनमुळे थोडा ताण जाणवेल. व्यावसायिकांनी या आठवड्यात सावध राहावं, कामात चढ-उतार येऊ शकतात. कोणताही नियम मोडू नका आणि कागदपत्रं नीट तपासूनच पुढचं पाऊल टाका, नाहीतर सरकारी कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे.

3/6
मकर - आठवड्याच्या उत्तरार्धात धावपळ जास्त होऊनही कामं पूर्ण न झाल्यामुळे थोडी निराशा किंवा थकवा येऊ शकतो. अशा वेळी लोकांशी बोलताना रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात शांतता राहावी असं वाटत असेल तर छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. जोडीदाराशी किंवा सासरच्या लोकांशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांत राहून परिस्थिती हाताळा. प्रेमसंबंधात पारदर्शकता ठेवा आणि दिखावा करू नका.भाग्यशाली रंग: गुलाबी
भाग्यशाली अंक: 1
मकर - आठवड्याच्या उत्तरार्धात धावपळ जास्त होऊनही कामं पूर्ण न झाल्यामुळे थोडी निराशा किंवा थकवा येऊ शकतो. अशा वेळी लोकांशी बोलताना रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात शांतता राहावी असं वाटत असेल तर छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. जोडीदाराशी किंवा सासरच्या लोकांशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांत राहून परिस्थिती हाताळा. प्रेमसंबंधात पारदर्शकता ठेवा आणि दिखावा करू नका.भाग्यशाली रंग: गुलाबीभाग्यशाली अंक: 1
advertisement
4/6
कुंभ (Aquarius) - कुंभ राशीच्या लोकांना या आठवड्यात आपली छोटी छोटी कामं पूर्ण करण्यासाठी सुद्धा बरीच धावपळ करावी लागेल. तुमची कामं थोडी सावकाश होतील, पण ती नक्की पूर्ण होतील. तुमच्या बुद्धीच्या जोरावर तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात कराल. भागीदारीतल्या व्यवसायात जे काही वाद होते, ते एखाद्या जुन्या मित्राच्या मध्यस्थीने चर्चेतून मिटतील. व्यवसायाबद्दल तुम्ही एखादा मोठा निर्णय या आठवड्यात घेऊ शकता आणि तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसतील. बाजारात अडकलेला पैसा अनपेक्षितपणे परत मिळेल.

5/6
मीन (Pisces) - मीन राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात प्रवासाने होऊ शकते. जर तुम्ही परदेशाशी संबंधित काम करत असाल किंवा बाहेर करिअर करायचा विचार करत असाल, तर परदेशवारीचे योग येतील. तुम्ही केलेल्या मेहनतीचं पूर्ण फळ या आठवड्यात तुमच्या पदरात पडेल. नोकरीत तुमचे बॉस तुमच्या कामावर खुश राहतील आणि तुम्हाला वरिष्ठांकडून बरंच काही शिकायला मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील आणि तुमची बचत वाढेल.

6/6
मीन - हा आठवडा केवळ करिअरमध्येच नाही तर आध्यात्मिक बाबतीतही प्रगतीचा ठरेल. एकीकडे व्यवसायात नफा आणि नोकरीत बढतीचा आनंद मिळेल, तर दुसरीकडे तुमचं मन समाजसेवा आणि धार्मिक कार्यात रमेल. एखाद्या मोठ्या संस्थेशी जोडून घेण्याची संधी मिळेल. मुलांच्या जबाबदाऱ्या तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. कुटुंबात सुख-शांती आणि प्रेम टिकून राहील. भावंडांची साथ मिळेल. तुमचं प्रेमप्रकरण अधिक घट्ट होईल आणि तब्येतही उत्तम राहील.भाग्यशाली रंग: निळा
भाग्यशाली अंक: 2
मीन - हा आठवडा केवळ करिअरमध्येच नाही तर आध्यात्मिक बाबतीतही प्रगतीचा ठरेल. एकीकडे व्यवसायात नफा आणि नोकरीत बढतीचा आनंद मिळेल, तर दुसरीकडे तुमचं मन समाजसेवा आणि धार्मिक कार्यात रमेल. एखाद्या मोठ्या संस्थेशी जोडून घेण्याची संधी मिळेल. मुलांच्या जबाबदाऱ्या तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. कुटुंबात सुख-शांती आणि प्रेम टिकून राहील. भावंडांची साथ मिळेल. तुमचं प्रेमप्रकरण अधिक घट्ट होईल आणि तब्येतही उत्तम राहील.भाग्यशाली रंग: निळाभाग्यशाली अंक: 2
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement