advertisement

जोडीदार असतानाही दुसऱ्या व्यक्तीबद्दल का वाटतं आकर्षण? एक्सपर्टनी सांगितलं धक्कादायक 'बायोलॉजिकल' कारण

Last Updated:
Valentine Special : जोडीदाराला फसवणं ही केवळ त्या व्यक्तीची वाईट वृत्ती असते की यामागे काही नैसर्गिक खेळ आहे? आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपण प्रेमाच्या त्या 'डार्क' विज्ञानाचा उलगडा करणार आहोत, ज्याचा संबंध थेट तुमच्या शरीरातील हॉर्मोन्सशी आहे.
1/7
व्हॅलेंटाईन डे म्हटलं की सगळीकडे गुलाबाचा सुगंध, गुलाबी प्रेम, प्रेमाच्या आणाभाका आणि आयुष्यभर सोबत राहण्याची वचनं ऐकू येतात. पण याच प्रेमाच्या उत्सवात एक काळी बाजूही लपलेली असते, ती म्हणजे 'धोका' किंवा 'फसवणूक'. जेव्हा एखादं सुंदर नातं अचानक तुटतं आणि त्याचं कारण फसवणूक असतं, तेव्हा
व्हॅलेंटाईन डे म्हटलं की सगळीकडे गुलाबाचा सुगंध, गुलाबी प्रेम, प्रेमाच्या आणाभाका आणि आयुष्यभर सोबत राहण्याची वचनं ऐकू येतात. पण याच प्रेमाच्या उत्सवात एक काळी बाजूही लपलेली असते, ती म्हणजे 'धोका' किंवा 'फसवणूक'. जेव्हा एखादं सुंदर नातं अचानक तुटतं आणि त्याचं कारण फसवणूक असतं, तेव्हा "तिने किंवा त्याने असं का केलं असेल?" हा प्रश्न काळजाला घर पाडतो.
advertisement
2/7
काय वाटतं तुम्हाला? जोडीदाराला फसवणं ही केवळ त्या व्यक्तीची वाईट वृत्ती असते की यामागे काही नैसर्गिक खेळ आहे? आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपण प्रेमाच्या त्या 'डार्क' विज्ञानाचा उलगडा करणार आहोत, ज्याचा संबंध थेट तुमच्या शरीरातील हॉर्मोन्सशी आहे.

3/7
एखाद्याशी निष्ठावान राहणं हे जितकं मनावर अवलंबून असतं, तितकंच ते शरीरातील रसायनांवरही (Hormones) अवलंबून असतं. अनेकदा आपण एखाद्याला 'कॅरेक्टरलेस' म्हणून सोडून देतो, पण हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि टेक्सास युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या विषयावर एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांच्या मते, जोडीदाराला धोका देण्यामागे व्यक्तीच्या शरीरातील दोन प्रमुख हॉर्मोन्स महत्त्वाची भूमिका बजावतात: टेस्टोस्टेरॉन (Testosterone) आणि कॉर्टिसॉल (Cortisol). चला यांच्याबद्दल थोडं सविस्तर समजून घेऊ.

4/7
1. जेव्हा 'कॉर्टिसॉल' निर्णयावर ताबा मिळवतंकॉर्टिसॉल हे शरीरातील 'स्ट्रेस हॉर्मोन' म्हणून ओळखलं जातं. संशोधनानुसार, ज्या व्यक्तींच्या शरीरात कॉर्टिसॉलचं प्रमाण सतत जास्त असतं, त्यांची योग्य आणि अयोग्य निवड करण्याची क्षमता मंदावते. दीर्घकालीन तणावामुळे मेंदू अशा काही लहरी निर्माण करतो की, व्यक्तीला नात्यातील गुंतागुंतीतून बाहेर पडण्यासाठी 'फसवणूक' हा एक सोपा मार्ग वाटू लागतो.

5/7
2. 'टेस्टोस्टेरॉन'चा अतिरेक आणि धोक्याची घंटाटेस्टोस्टेरॉन हे प्रामुख्याने पुरुषांमध्ये आढळत असलं तरी ते महिलांमध्येही असतं. हाय टेस्टोस्टेरॉनमुळे व्यक्तीमध्ये 'रिस्क घेण्याची' आणि 'नवं शोधण्याची' वृत्ती वाढते. जेव्हा हे हॉर्मोन मर्यादेबाहेर जातं, तेव्हा व्यक्तीला आपल्या जोडीदाराची फसवणूक करण्यात एक प्रकारचा थरार किंवा आनंद (Thrill) वाटू लागतो. संशोधनात असं आढळलंय की, ज्यांच्यात ही दोन्ही हॉर्मोन्स जास्त असतात, त्यांना फसवणूक केल्यावर पश्चाताप होण्याऐवजी एक विचित्र समाधान मिळतं.

6/7
3. सायन्स काय सांगतं?हाय कॉर्टिसॉलमुळे निर्माण झालेला तणाव आणि हाय टेस्टोस्टेरॉनमुळे आलेला आक्रमक आत्मविश्वास जेव्हा एकत्र येतात, तेव्हा नात्यातील 'निष्ठा' हा शब्द दुय्यम ठरतो. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, हे हॉर्मोन्स तुमच्या मेंदूला असं प्रोग्राम करतात की तुम्हाला नियमांपेक्षा नियमांची पायमल्ली करण्यात जास्त रस वाटू लागतो.

7/7
जरी विज्ञानाने हॉर्मोन्सचं कारण दिलं असलं, तरी माणूस हा केवळ रसायनांचा पुतळा नाही. नातं टिकवण्यासाठी 'इच्छाशक्ती' आणि 'विश्वास' हे हॉर्मोन्सपेक्षा मोठे असतात. आज व्हॅलेंटाईन डे आहे, जर तुमचं कोणावर खरं प्रेम असेल, तर केवळ हॉर्मोन्सच्या आहारी न जाता आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणं हीच खरी 'व्हॅलेंटाईन भेट' ठरेल. कारण, हॉर्मोन्स आज कमी-जास्त होतील, पण तुटलेला विश्वास पुन्हा कधीच जोडला जात नाही

SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement