advertisement

कट्टर काँग्रेसी, निष्णात वकील, वडील आमदार राहिले, सुनेत्रा पवारांविरोधात उतरलेले आकाश मोरे कोण आहेत?

Last Updated:

Baramati Akash More: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या आदेशाने आकाश विजय मोरे यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर करण्यात आले.

आकाश मोरे (बारामती काँग्रेस उमेदवार)
आकाश मोरे (बारामती काँग्रेस उमेदवार)
मुंबई : बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी खुद्द सुनेत्रा पवार यांनी बरेच प्रयत्न करूनही काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले कट्टर कार्यकर्ते आकाश विजयराव मोरे यांना सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवारी जाहीर झाली आहे. आकाश मोरे यांना उमेदवारी देऊन काँग्रेस पक्षाने धनगर कार्ड खेळल्याची चर्चा आहे. आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या बारामतीला जाणार आहेत.
अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात लढायचेच, अशी रणनीती काँग्रेस पक्षाने आखली होती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही काँग्रेस पक्षाने उमेदवार देण्याचे पक्के केले होते. त्यानुसार रविवारी रात्री राजधानी नवी दिल्लीतून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या आदेशाने आकाश विजय मोरे यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले.
advertisement

कोण आहेत आकाश विजय मोरे?

अॅड आकाश मोरे हे माजी आमदार विजयराव मोरे यांचे चिरंजीव असून काँग्रेस पक्षाचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते सचिव देखील आहेत. गेल्या दोन दशकांपासून ते सामाजिक आणि कायदेशीर क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यांच्या वडिलांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विधानपरिषदेवर आमदार होण्याची संधी मिळाली होती.
advertisement
आकाश मोरे यांनी बी.ए. एलएलबी हे शिक्षण पूर्ण केले असून गेल्या पंधरा वर्षांपासून बारामती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ते यशस्वीपणे वकिली व्यवसाय करत आहेत. कायद्याच्या क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि प्रामाणिक कामकाजामुळे त्यांची ओळख एक विश्वासार्ह वकील म्हणून निर्माण झाली आहे.
यासोबतच, ते सामाजिक कार्यातही सक्रिय असून बारामती तालुक्यातील मोर्टी येथील आश्रम शाळेमध्ये सदस्य म्हणून कार्य करत आहेत. शिक्षण व समाजसेवेच्या माध्यमातून ते आपले योगदान देत आहेत. बारामतीमध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ते वसतिगृह चालवतात, जेणेकरून पैशांअभावी कोणाचेही शिक्षण थांबू नये. त्यांच्या मूळ गावी भटक्या विमुक्त समाजातील मुलांसाठी ४०० विद्यार्थ्यांची निवासी आश्रमशाळा ते यशस्वीपणे चालवत आहेत. उपेक्षितांच्या आयुष्यात प्रकाशाची वाट निर्माण करणे, हेच त्यांचे ध्येय आहे.
advertisement

काँग्रेसने धनगर कार्ड खेळल्याची चर्चा

बारामती तालुक्यात धनगर समाजाचे मतदान जवळपास ७० हजारांहून अधिक आहे. हेच लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने आकाश मोरे यांच्या रूपाने धनगर कार्ड खेळल्याची चर्चा आहे.

...तर माझी उमेदवारी मागे घेईन- तिकीट जाहीर होताच आकाश मोरेंची पहिली प्रतिक्रिया

लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत असून आमचा मूळ शत्रू हा भाजप आहे, अशी पहिली प्रतिक्रिया उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आकाश मोरे यांनी दिली. जर राज्य सरकारने अजित पवारांच्या अपघातासंदर्भाने गुन्हा दाखल केला तर माझी उमेदवारी मागे घेईन, असेही आकाश मोरे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कट्टर काँग्रेसी, निष्णात वकील, वडील आमदार राहिले, सुनेत्रा पवारांविरोधात उतरलेले आकाश मोरे कोण आहेत?
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement