advertisement

ट्रम्प धमक्या अन् अल्टिमेटम देत बसले, इकडे इराणचा मोठा पलटवार; C-130 सह दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स उडवली

Last Updated:

US- Iran War: इराणमध्ये अमेरिकेच्या बचाव मोहिमेदरम्यान तीव्र चकमकी झाल्याचा दावा करत IRGC ने अनेक विमानं पाडल्याचा आरोप केला आहे.

News18
News18
तेहरान: इराणमध्ये कोसळलेल्या लढाऊ विमानातील क्रू सदस्याला वाचवण्यासाठी अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईदरम्यान किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने केला आहे, असे इराण माध्यमांनी वृत्त दिले आहे. या संघर्षात काही “उडणाऱ्या वस्तू” देखील नष्ट करण्यात आल्याचे गार्ड्सने सांगितले असून, यात बचाव मोहिमेत सहभागी असलेले एक ट्रान्सपोर्ट विमानही समाविष्ट असल्याचा दावा करण्यात आला आहे.
खातम अल-अनबिया सेंट्रल हेडक्वार्टर्सचे प्रवक्ते जे इराण सशस्त्र दलांचे संयुक्त कमांड केंद्र आहे. त्यांनी सांगितले की, दक्षिण इस्फहानमध्ये एक C-130 लष्करी वाहतूक विमान आणि दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स पाडण्यात आले. याशिवाय इराण सैन्याने एक इस्रायली ड्रोनही पाडल्याचा दावा करण्यात आला आहे.
ही घटना दक्षिण इराणमध्ये तीव्र लढाईदरम्यान घडल्याचे सांगितले जाते. जेव्हा अमेरिकन सैन्याने उच्च जोखमीची बचाव मोहीम राबवली होती. इराण अधिकाऱ्यांनी या घडामोडींना अमेरिकेच्या मोहिमेसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. मात्र वॉशिंग्टनने केवळ क्रू सदस्य सुरक्षितपणे सापडल्याची पुष्टी केली असून, कथित नुकसानीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
advertisement
यापूर्वीच अमेरिकेने F-15E लढाऊ विमानातील दुसऱ्या क्रू सदस्यालाही वाचवण्यात यश आल्याची पुष्टी केली होती.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) नुसार, हरवलेल्या अधिकाऱ्याचा शोध घेत असताना दक्षिण इस्फहान भागात या विमानांवर हल्ला करण्यात आला. फार्स न्यूज एजन्सीने याबाबत वृत्त दिले आहे.
IRGC ने दावा केला की बचाव मोहिमेदरम्यान त्यांनी एक अमेरिकन विमान पाडले. फार्सने आपल्या टेलिग्राम चॅनेलवर एक फोटो शेअर केला असून, त्यात एका शेतातून दाट धूर उठताना दिसत आहे. या फोटोला “ट्रम्पचा मोठा पराभव लपवण्याचा हताश प्रयत्न” असे वर्णन करण्यात आले आहे.
advertisement
या अहवालानुसार हे विमान कोहगिलुयेह काउंटीतील देहदश्त जवळ आढळले. या भागात गेल्या दोन दिवसांपासून हल्ले होत असल्याचेही सांगितले गेले आहे.
तसेच या परिसरात किमान चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र नेमका मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. यापूर्वी इराण अधिकाऱ्यांनी नागरिकांना हरवलेल्या अमेरिकन क्रू सदस्याचा शोध घेण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते आणि त्याच्या ठावठिकाणाची माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले होते.
advertisement
डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हरवलेला क्रू सदस्य सापडल्याची घोषणा केली. सोशल मीडियावर त्यांनी लिहिले, “WE GOT HIM! गेल्या काही तासांत अमेरिकन सैन्याने इतिहासातील सर्वात धाडसी शोध आणि बचाव मोहिमांपैकी एक यशस्वी केली… आणि मला सांगताना आनंद होत आहे की तो आता सुरक्षित आहे.
बचाव मोहिमेबाबत काय माहिती?
अल जझीराच्या वृत्तानुसार एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की दुसरा क्रू सदस्य “तीव्र गोळीबाराच्या” दरम्यान शोधण्यात आला. जरी त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले असले तरी बचाव पथकाला इराणच्या सीमेतून सुरक्षितपणे बाहेर पडणे आवश्यक होते.
advertisement
Axios च्या वृत्तानुसार ही मोहीम विशेष कमांडो युनिटने पार पाडली होती. ज्यांना हवाई मदतही देण्यात आली होती. मोहिमेत सहभागी सर्व दल आता इराणमधून बाहेर पडल्याचेही सांगण्यात आले. अल जझीराला एका अधिकाऱ्याने सांगितले की, बचाव पथकाने देशाबाहेर सुरक्षितपणे बाहेर पडणे हे त्या हवाई दलातील कर्मचाऱ्याच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे होते.
अमेरिकन अधिकाऱ्यांची पुष्टी
यानंतर रॉयटर्सने वृत्त दिले की दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी इराणमध्ये पाडण्यात आलेल्या F-15 विमानातील एअरमनच्या सुटकेची पुष्टी केली आहे. असोसिएटेड प्रेसनेही अधिकृत घोषणेपूर्वी दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली की हरवलेला सैनिक सुरक्षितपणे सापडला आहे.
advertisement
या अहवालानुसार शुक्रवारी विमान पाडल्यानंतर तीव्र शोध आणि बचाव मोहिम राबवण्यात आली होती. यापूर्वी एका क्रू सदस्याची सुटका करण्यात आली होती, तर आता दुसऱ्यालाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
ट्रम्प धमक्या अन् अल्टिमेटम देत बसले, इकडे इराणचा मोठा पलटवार; C-130 सह दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स उडवली
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement