advertisement

BBM6 च्या स्पर्धकांना रितेश देशमुखचं मोठं सरप्राइज, TV वर पहिल्यांदाच दाखवली 'ती' गोष्ट, तुम्ही ओळखली?

Last Updated:

Raja Shivaji Teaser: अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा ग्रँड फर्स्ट लूक टीझर आज पहिल्यांदाच नॅशनल टेलिव्हिजनवर झळकला आहे.

News18
News18
मुंबई : आजची रात्र अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि तमाम शिवप्रेमींसाठी अत्यंत खास ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' चा खेळ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच, आजच्या एपिसोडमध्ये एक असा क्षण येणार आहे जो प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलली आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा ग्रँड फर्स्ट लूक टीझर आज पहिल्यांदाच नॅशनल टेलिव्हिजनवर झळकला आहे.
दर शनिवार रविवारी कलर्स मराठी वाहिनीवर भाऊचा धक्का एपिसोड प्रदर्शित केला जातो. पण आजचा 'बिग बॉस मराठी'च्या भाऊचा धक्का एपिसोड आणखीनच खास झाला आहे. कारण आज या एपिसोडमध्ये ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा ग्रँड फर्स्ट लूक टीझर रिलीज झाला आहे. आज, ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार वर हा टीझर आपल्याला पाहायला मिळाला.
advertisement

अंगावर शहारे आणणारा अनुभव

'राजा शिवाजी' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा महान इतिहास आणि त्यांचा स्वराज्य स्थापनेचा प्रवास या चित्रपटातून भव्य दिव्य रूपात मांडण्यात आला आहे. नुकताच या चित्रपटाचा सोशल मीडिया टीझर समोर आला होता, जो पाहून प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले होते. आता या चित्रपटाची अधिकृत पहिली झलक थेट टीव्हीवर प्रदर्शित करून रितेश देशमुखने चाहत्यांना मोठी भेट दिली आहे.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)



advertisement

१ मे २०२६ ला होणार ऐतिहासिक धमाका

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, म्हणजेच येत्या १ मे २०२६ रोजी 'राजा शिवाजी' संपूर्ण जगात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ रितेशने याचे दिग्दर्शन केले नसून, तो स्वतः या ऐतिहासिक भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज मराठी आणि हिंदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
BBM6 च्या स्पर्धकांना रितेश देशमुखचं मोठं सरप्राइज, TV वर पहिल्यांदाच दाखवली 'ती' गोष्ट, तुम्ही ओळखली?
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement