Mumbai News: गॅस सिलिंडर चोरीचा पर्दाफाश, गुन्हे शोध पथकाकडून 45 सिलिंडरसह आरोपी अटकेत
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मध्य पूर्वेतील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी गॅस सिलिंडर चोरीच्या आरोपावरून 45 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.
मुंबई: अमेरिका- इराण- इस्राईल देशामधील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, पवई पोलिसांनी गॅस सिलिंडर चोरल्याच्या आरोपावरून एका 45 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्या व्यक्तीकडून पोलिसांनी चोरी केलेले 45 सिलिंडर आणि तीन बाईक जप्त केल्या आहेत.
ठाण्याच्या वर्तकनगर भागातील रहिवासी असलेला आरोपी राज चंद्रकांत कांबळे याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासह अनेक भागांतून एलपीजी सिलिंडरची चोरी केलेली आहे. मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, कांबळे व्यतिरिक्त, चोरीचे सिलिंडर विकण्यासाठी आणखी दोघांचा हात आहे. सिलिंडर विकण्यासाठी राज कांबळे याला मदत केल्याच्या आरोपाखाली त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.
advertisement
पुढे मिडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शोध पथकाच्या दोन पथकांनी एक विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेंतर्गत सिलिंडरची अनधिकृत रित्या चोरी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. शिवाय, पोलिसांनी आरोपींसह 45 सिलिंडर आणि तीन बाईक जप्त केल्या आहेत. दरम्यान, अशाच आणखी एका प्रकरणात, नागरी पुरवठा विभागाने वाशीमध्ये अवैध गॅस सिलेंडर साठेबाजीवर कारवाई केली. 13.91 लाख रुपयांचा माल जप्त केला आणि पुरवठ्याच्या कमतरतेच्या काळात जास्त दराने सिलेंडर विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली.
advertisement
या प्रकरणात, इरफान शेख आणि फिरोज कवास अशी ओळख पटलेल्या आरोपींना वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा केल्याबद्दल त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायदा, 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान, वाहनांमध्ये सापडलेले 55 भरलेले सिलिंडर आणि कार्यालयाच्या आवारात ठेवलेले 68 रिकामे सिलिंडर जप्त करण्यात आले, त्यामुळे एकूण सिलिंडरची संख्या 123 झाली आहे. वारंवार, अवैध पद्धतीने गॅस सिलिंडरची विक्री करणाऱ्या टोळीला अद्दल घडवण्यासाठी गुन्हे शोध पथक सध्या सक्रिय आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 8:06 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: गॅस सिलिंडर चोरीचा पर्दाफाश, गुन्हे शोध पथकाकडून 45 सिलिंडरसह आरोपी अटकेत









