advertisement

Mumbai Fish Prise: आता मच्छीही महागाली! पापलेट, सुरमई अन् हलव्याच्या किंमती पाहून धक्काच बसेल

Last Updated:

Fish Prices Increase In Mumbai: अमेरिका- इराण- इस्राइल देशातील वाढत्या तणावामुळे कच्चा तेलाचे दर गगनाला भिडले आहेत, आता त्याचा थेट परिणाम मासेमारीवर ही झाला आहे. त्यामुळे मासे महाग झाले आहेत.

News18
News18
मुंबई: मध्य पूर्वेतील वाढता तणाव पाहता कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिमकांचं जगणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. कच्चा तेलावर अवलंबून राहणाऱ्या वस्तुंच्या किंमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आता अशातच मच्छीमारीच्या व्यवसायामध्ये सुद्धा वाढ होत आहे. अमेरिका- इराण- इस्राइल देशातील वाढत्या तणावामुळे डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत, आता त्याचा थेट परिणाम मासेमारीवर ही झाला आहे. शिवाय मासे सुद्धा महाग झाले आहेत. माशांच्या सध्याच्या किंमती पाहून ते सर्व सामान्यांच्या आवाक्या बाहेर चालले आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबईमध्ये माशांच्या किंमती पूर्वी 200 रूपये प्रतिकिलो इतकी होती. पण आता 350 रूपये इतकी प्रतिकिलो इतकी झाली आहे. दरम्यान, सध्या मुंबईच्या बाजारामध्ये सुरमई मच्छीची प्रतिकिलोची किंमत 1000 रू. इतकी झाली आहे, जी पूर्वी 700 रू. प्रतिकिलो इतकी होती. तर, पापलेट मच्छीची सध्याची किंमत 1200 रू. प्रतिकिलो इतकी आहे. जेव्हा मच्छीमार समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जातात, तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावर डिझेल लागते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर डिझेलची किंमत 144 रूपये प्रतिलिटर आहे, याची पूर्वी किंमत 70 रूपये प्रतिलिटर इतकी होती. डिझेलचे एवढी किंमत वाढल्यामुळे मच्छीमार मासेमारी करण्यासाठी समुद्रात जात नाहीत.
advertisement
मोठमोठ्या बोटी बंदरावर उभ्या असल्यामुळे माशांची आवक होत नाहीये. मच्छीची आवक होत नसल्यामुळे मच्छीच्या किंमतींमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिझेलच्या किंमती दुप्पट वाढल्यामुळे हजारो लीटरची आवश्यकता असणारे डिझेल खरेदी करून मच्छीमारांना मासेमारी करणं शक्य नसल्यामुळे त्यांनी मासेमारी बंद ठेवण्याचाच निर्णय घेतला आहे. मच्छिमारांना समुद्रामध्ये ऐवढ्या महागाचं डिझेल घेवून मासेमारी करणे परवडणारे नाही. त्यामुळे त्यांनी मासेमारी बंद ठेवण्याचाच निर्णय घेतला आहे. डिझेलच्या वाढत्या किंमतीचा फटका सुख्ख्या मच्छींवरही बसण्याची शक्यता आहे. सध्या साधी मच्छी महागली असून लवकरच सुख्खी मच्छी सुद्धा महागेल.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Mumbai Fish Prise: आता मच्छीही महागाली! पापलेट, सुरमई अन् हलव्याच्या किंमती पाहून धक्काच बसेल
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement