'एक वेलची 4 रुपये'! 8 महिन्यांत 500 रुपयांनी वाढले दर, कोल्हापूरच्या बाजारात 1kg चा दर किती?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Cardamom Price : खाद्यपदार्थांची चव आणि सुगंध वाढवणारी वेलची आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून वेलचीच्या दरात सातत्याने...
Cardamom Price : खाद्यपदार्थांची चव आणि सुगंध वाढवणारी वेलची आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून वेलचीच्या दरात सातत्याने वाढ होत असून, सध्या तिचा भाव 3200 ते 4000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठ महिन्यांत दरात तब्बल 500 रुपयांची वाढ झाली आहे.
वेलचीचे महत्त्व
वेलची हा भारतीय मसाल्यांच्या डब्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. गोड पदार्थांपासून ते तिखट पदार्थांपर्यंत, चहा आणि दुधातही तिचा वापर होतो. श्रावण ते दिवाळी या सणासुदीच्या काळात वेलचीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, ज्यामुळे तिची मागणी वाढते.
आरोग्याचे फायदे
वेलची फक्त चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. ती पचन सुधारते, सर्दी-खोकला कमी करते, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि ताणतणाव कमी करून मन शांत ठेवते. तसेच, मुखशुद्धीसाठीही तिचा वापर केला जातो.
advertisement
दरवाढीचे कारण
वेलचीचे उत्पादन मुख्यतः केरळ, तमिळनाडू आणि काही प्रमाणात कर्नाटकात होते. गेल्या दोन वर्षांपासून या राज्यांमध्ये वेलचीचे उत्पादन कमी झाले आहे. मागणी कायम असताना आवक कमी झाल्यामुळे दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनीही याला दुजोरा दिला असून, उत्पादन कमी झाल्याने दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे सांगितले.
वेलचीचे प्रकार आणि दर
वेलचीमध्ये प्रामुख्याने हिरवी वेलची आणि मसाल्यांसाठी वापरली जाणारी मसाला वेलची असे दोन प्रकार आहेत. गुणवत्तेनुसार वेलचीचे दर 3500 रुपयांपासून ते 4000 रुपयांपर्यंत आहेत. यामुळे, एका वेलचीसाठी आता 4 रुपये मोजावे लागत आहेत.
advertisement
हे ही वाचा : तासगावात भाजपची नवी खेळी! 'काका' गटाला बगल, भाजप 'स्वबळावर' लढण्याच्या तयारीत, पारंपरिक राजकारण संपणार?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 11:26 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
'एक वेलची 4 रुपये'! 8 महिन्यांत 500 रुपयांनी वाढले दर, कोल्हापूरच्या बाजारात 1kg चा दर किती?