तासगावात भाजपची नवी खेळी! 'काका' गटाला बगल, भाजप 'स्वबळावर' लढण्याच्या तयारीत, पारंपरिक राजकारण संपणार?
- Published by:Arjun Nalavade
 
Last Updated:
तासगाव तालुक्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आतापर्यंत 'आबा गट' विरुद्ध 'काका गट' अशा पारंपरिक...
Tasgaon Politics : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आतापर्यंत 'आबा गट' विरुद्ध 'काका गट' अशा पारंपरिक लढतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यात, यंदा नवीन राजकीय समीकरणे दिसण्याची शक्यता आहे. भाजपने यावेळी माजी खासदार संजय पाटील यांच्या गटाला बाजूला ठेवून निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी
तासगाव तालुक्यात आजवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गटांना महत्त्व देऊन लढवल्या गेल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यांच्या विरोधात नेहमी लढणाऱ्या संजय पाटील यांच्या गटात मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच संजय पाटील गटाला वगळून भाजपची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली होती.
advertisement
तासगावचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील आणि किसान मोर्चाचे संदीप गिड्डे-पाटील तालुक्यात स्वबळावर लढण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. त्यामुळे, यावेळी भाजप 'काका गटाला' वगळून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
राजकीय समीकरणे बदलणार?
या घडामोडींमुळे तासगाव तालुक्यात आतापर्यंत सुरू असलेल्या पारंपरिक गटाच्या राजकारणाला मोठा धक्का बसू शकतो. निवडणुकीचे रंग बदलणार असून, यंदा येथे एक नवीनच राजकीय चित्र पाहायला मिळेल अशी चर्चा सुरू आहे.
advertisement
हे ही वाचा : पुण्यात जाताय? आधी 'हे' वाचा! पंचगंगेवरील पूल राहणार बंद, वाहतूक कोंडी वाढणार, वापरा 'हे' 2 पर्यायी मार्ग!
हे ही वाचा : विद्यार्थीनींच्या 'टिकली'वर शाळेची बंदी, पालकांचा संताप, रोषानंतर निर्णय मागे, कोल्हापुरात घडलं काय?
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 9:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तासगावात भाजपची नवी खेळी! 'काका' गटाला बगल, भाजप 'स्वबळावर' लढण्याच्या तयारीत, पारंपरिक राजकारण संपणार?


