विद्यार्थीनींच्या 'टिकली'वर शाळेची बंदी, पालकांचा संताप, रोषानंतर निर्णय मागे, कोल्हापुरात घडलं काय?
- Published by:Arjun Nalavade
 
Last Updated:
इचलकरंजी येथील आंतरभारती विद्यालयाने शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थिनींना शाळेत टिकली लावून येण्यास मनाई केली होती. हा नियम समजल्यानंतर संतप्त पालक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी...
इचलकरंजी : 'विद्यार्थिनींनी शाळेत टिकली लावून येऊ नये', असा अजब नियम इचलकरंजी येथील आंतरभारती विद्यालयाने लागू केला होता. या निर्णयामुळे संतप्त पालक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी शाळेत धाव घेतली. त्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर प्रश्नांचा भडिमार केला. अखेर, जोरदार विरोध झाल्यानंतर शाळेला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.
शिस्तीच्या नावाखाली बंदी
विद्यार्थिनी एकसारखी टिकली लावत नाहीत, त्यामुळे शाळेची शिस्त बिघडत आहे, असे कारण देत विद्यालय व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला होता. विद्यार्थिनींनी घरी जाऊन पालकांना याबद्दल सांगितले. त्यानंतर, संतप्त पालक आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शाळेत एकत्र जमले.
शाळेत मोठा गोंधळ
शाळेमध्ये सुमारे पाऊण तास गोंधळ सुरू होता. पालक आणि कार्यकर्त्यांनी 'हिंदुत्ववादी परंपरा आणि संस्कृती जपण्यास कोणीही मनाई करू शकत नाही,' असे ठणकावून सांगितले. त्यांनी मुख्याध्यापकांवर या निर्णयाचा निषेध करत, तो तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. अखेर, वाढता विरोध पाहता मुख्याध्यापकांनी टिकली न लावण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.
advertisement
हे ही वाचा : Lightning Strike Temple: वीज कडाडली अन् देवस्थानात कहर, मंदिराच्या कळासाला तडे, उपकरणांचे नुकसान
हे ही वाचा : पुण्यात जाताय? आधी 'हे' वाचा! पंचगंगेवरील पूल राहणार बंद, वाहतूक कोंडी वाढणार, वापरा 'हे' 2 पर्यायी मार्ग!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 8:45 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
विद्यार्थीनींच्या 'टिकली'वर शाळेची बंदी, पालकांचा संताप, रोषानंतर निर्णय मागे, कोल्हापुरात घडलं काय?


